नागपूर: वातावरणातील बदलामुळे डेंगी,स्वाईन फ्लू व स्क्रब टायफस अशा आजारांनी डोके वर काढले आहे. नागपुरात स्क्रब टायफस या जीवाणूजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी या आजाराचे रुग्ण आढळलेल्या भागात कीटकनाशक फवारणी करावी असे निर्देश आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी आज दिले. स्क्रब टायफसच्या प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्क्रब टायफस या आजारासंबंधी आरोग्य यंत्रणांचा आढावा घेणारी बैठक आरोग्य उपसंचालकांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आरोग्य उपसंचालक डॉ.संजीव जयस्वाल, सहायक संचालक हिवताप डॉ . मिलींद गणवीर,डॉ.योगेन्द्र बन्सोड यासह आरोग्य यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आढावा बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींशी आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी संवाद साधला.
स्क्रब टायफस या आजाराचा जीवाणू हा उंदीर, घुशी, यांच्या अंगावर आढळत असल्याचे सांगून डॉ.दीपक सावंत म्हणाले की गवत किंवा झुडपांवर ही हा जीवाणू आढळत असल्याचे लक्षात आले आहे. या आजाराची लक्षणे ही ताप येणे,डोके दुखणे,अशी आढळतात अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
स्क्रब टायफस रूग्णांच्या शरीरावर प्रथमत: खपली किंवा चट्टा दिसतो. अकोला,अमरावती,नागपूर ,वर्धा,गडचिरोली या भागातून एकूण 24 संशयित रूग्ण शहरातील खासगी व शासकीय रूग्णालयात दाखल झाले होते. संसर्ग झालेल्या रूग्णांच्या शरीरातील अवयव यंत्रणा निकामी झाल्याने आतापर्यत 6 रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे.
स्क्रब टायफसचे रुग्ण हे अन्य राज्यातून उपचारासाठी येथे आले असल्याची माहितीदेखील त्यांनी यावेळी दिली. या आजारावर ॲजिथ्रोमायसीन व डॉक्सिसायक्लीन ही औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांसाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत.
शहरात कीटकनाशकांची फवारणी करण्याच्या सूचना त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. स्क्रब टायफस सोबतच डेंगी,स्वाईन फ्लू ,मलेरिया या आजारांना पायबंद घालण्यासाठी नागरिकांनीदेखील प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
शहरातील उद्वाहनांमध्ये व होर्डींगद्वारेदेखील या आजाराविषयी जाणीव जागृती करणारे प्रचार साहित्य लावण्याची सूचना यावेळी डॉ. सावंत यांनी आरोग्य यंत्रणांना केली. स्क्रब टायफस या आजारामुळे नागरिकांनी घाबरून न जाता प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
शराब पार्टी के बाद 6.60 लाख पर हाथ साफ! #NagpurNews #Crime #Fraud...
फर्जी पेमेंट स्क्रीनशॉट से सायाजी होटल में ठगी... #NagpurNews #FakePayment #HotelFraud #crimenews
नागपुर के कलमना और नंदनवन इलाके में दुष्कर्म की घटनाएं #NagpurNews #CrimeNews...
उर्स की भीड़ में कार पर वार! #NagpurNews #CrimeNews #Theft #CarTheft #BagLifting...
व्हाट्सऐप पर मुनाफे का झांसा... #NagpurNews #CyberFraud #WhatsAppScam #CyberCrime #InvestmentScam
ताजबाग उर्स में युवक पर पत्थरों से जानलेवा हमला #vidharbnews #nagpur #newsupdate...






