Published On : Tue, Sep 21st, 2021

प्रभाग २६मध्ये आरोग्य तपासणी शिबिर

Advertisement

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने आयोजन

नागपूर : भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि नुकताच झालेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस या दोन्ही औचित्याने पूर्व नागपुरातील प्रभाग २६मध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या हस्ते शिबिराचे उद्धाटन करण्यात आले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने ‘सेवा ही समर्पण’ या भावनेतून भाजपा प्रदेश सचिव तथा प्रभाग २६चे नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्यावतीने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रा. प्रमोद पेंडके, प्रभाग २६च्या नगरसेविका समिता चकोले, प्रभाग २६चे भाजपा अध्यक्षद्वय राजेश संगेवार व सुरेश बारई, राजू गोतमारे, सुनील सुर्यवंशी, लक्की वराडे, अनंता शास्त्रकार, नारायणसिंग गौर, डॉ.हरीश राजगिरे, भूपेश अंधारे, विनोद कुठे, सुरेश उदापुरकर, बलराम निषाद, विनोद बांगडे, ज्योती वाघमारे, कविता हत्तीमारे, सिंधू पराते, गायत्री उचितकर, कल्पना सार्वे, डॉली सारस्वत, छाया गुज्जेवार, सपना श्रीवास्तव आदी उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने संपूर्ण शहरामध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत पूर्व नागपूरमध्ये आमदार कृष्णा खोपडे यांच्या नेतृत्वात महिला, बालक आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या श्रृंखलेत प्रभाग २६मधील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने शिबिराचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या विविध आजारांबाबत जनजागृती आणि त्यावर वेळेत उपचार मिळावे या उद्देशाने महिलांसाठी विशेष व्यवस्था शिबिरामध्ये करण्यात आली आहे. संपूर्ण शहरामध्येही याच स्वरूपाची शिबिरे भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश सचिव तथा नगरसेवक ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी दिली.

शिबिरामध्ये आरोग्य सुविधेकरिता डॉ. प्रशांत शिंदे, गुलशन कावडे, डॉ. दिप्ती कवाडे, कांचन पांडे, डॉ. पवन गवळी, आकांक्षा बोधरे, शुभम मरसकोल्हे, कोमल ठाकरे, इशानी ठेंगडी, राजीव मिश्रा, अमन ताजने, साहिल पाटील, सिद्धार्थ, कोमल आदी चमूने सहकार्य केले.