नागपूर : सोशल मीडियावर सध्या ‘ऑल आईज ऑन राफा’ ही ओळ ट्रेंडिंगमध्ये आली आहे. हजारो-लाखो नेटकरी या मोहिमेला समर्थन करत आहेत. तर काही जण या मोहिमेचा विरोध करत आहेत. या मुद्द्यावरुन दोन गट पडले असून, एकमेकांवर टीका-टिप्पणी केली जात आहे. नागपूरच्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षा शिवानी दाणी यांनी यावर नागपूर टुडेशी बोलताना भाष्य करत मोहिमेचा निषेध केला आहे.
‘ऑल आईज ऑन राफा’ या मोहिमेला समर्थन करणे करणारे लोक जेव्हा कश्मीर मध्ये हिंदू लोकांवर अत्याचार होतांना गप्प का होते. तसेच पाकिस्तान मध्ये हिंदूवर जे अत्याचार केले जात आहेत त्यावर या लोकांनी आवाज का उचलला नाही,असा संतप्त सवाल शिवानी दाणी यांनी उपस्थित केला आहे.’ऑल आईज ऑन राफा’ या मोहोमेला समर्थन करणाऱ्या लोकांना तेव्हा ‘ऑल आईज ऑन कश्मीर किंवा पाकिस्तान करावेसे नाही वाटले का, असेही त्या म्हणाल्या.
काय आहे ‘ऑल आईज ऑन राफा’ ?
ऑल आईज ऑन राफा’ हे एक अभियान आहे. गाझा भागात होत असलेल्या हल्ल्यांकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी हे अभियान सुरु करण्यात आले आहे. गाझामध्ये सैनिकांनी केलेल्या हल्ल्यामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. गाझामध्ये इस्त्रायल आणि हमासचे युद्ध सध्या चिंतेचा विषय बनला आहे. हमासचे दहशतवादी राफा शहरात लपून हल्ले करत आहेत, त्यामुळेच इस्रायलने स्वसंरक्षणार्थ राफामध्ये कारवाई केली. दरम्यान, इस्रायलने राफत केलेल्या हल्ल्यात शेकडो निष्पाप लोकांचा जीव गेल्याची माहिती आहे.