Published On : Wed, Jun 3rd, 2020

तेलनखेडी पांधन रस्त्यावरील अति क्रमण काढल्याने गावक-यात आंनद

Advertisement

कन्हान : – अनेक वर्षापासुन तेलनखेडी बनपुरी पांधन रस्त्यावर बाजुच्या शेतक-यांनी वाहीत करून अतिक्रमण काढण्या स अडचण निर्माण केली. स्मशान भुमि ची जागा कमी असल्याने पांधन रस्त्याचे अतिक्रमण ग्राम पंचायत व ग्रामस्थाच्या विनतीने तहसिलदारांनी काढुन सरकारी जागा सार्वजनिक उपयोगास मोकळी के ल्याने गावक-यानी आंनद व्यकत करून प्रशासनाचे आभार व्यकत केले.

तेलनखेडी बनपुरी सरकारी पांधन रस्ता श्री राजकुमार काळे यांनी उठीत व वाहीत करून अतिक्रमण केले असल्या ची गावक-यांच्या मार्फत माजी ग्रा प सद स्य पुरणदास तांडेकर यांनी ग्राम पंचायत व तहसिलदार पारशिवनी यांना दि.२७ जुन २०१३ ला तक्रार अर्ज करून अति क्रमण काढण्याची विनंती केली होती. दि १३ मार्च २०१५, दि.२७ मे २०१९ असे वारंवार सरकारी पाधन रस्त्याचे अतिक्र मण हटविण्याचे अर्ज करण्यात आले. जिल्हा परिषदेने फेब्रुवारी २०१९ मध्ये पांधन रस्ता १ कि मीटरचे मातीकाम कर ण्यास अडथळा केल्याने रस्ता स्मशान भुमिच्या जागेतुन करण्यात आला.

लगेच मुख्यमंत्री सडक योजनेतुन खडीकरण व डामरीकरण करण्यात आले. गावक-यां ना स्मशान भुमि व बनपुरीला ये-जा करिता त्रास असल्याने ग्राम पंचायत व तहसिलदारांना वारंवार अतिक्रम हटवि ण्याकरिता तक्रार केल्याने ग्राम पंचाय तीने तहसिलदार पारशिवनी यांना दि.४ मे २०१९ ला ठराव पास करून दि ८ मे २०१९ निवेदन दिल्याने तहसिलदारांनी २ जुन २०१९ ला मोका चौकसी करून दि १५ जुलै २०१९ ला भुमापन अभिले ख कार्यालयास मोजणीचे आदेश करून दि २६ जुलै २०१९ ला मोजणी केली. तेव्हा राजकुमार काळे यांनी क प्रत वर आक्षेप घेऊन स्वत: दि ४ मार्च २०२० ला मोजणी केली तरी सु़ध्दा अतिक्रम दिसुन आले.

ग्राम पंचायत व राष्ट्रवादी कॉग्रेस पारशिवनी तालुका कार्याध्यक्ष पुरणदास तांडेकर हयानी गावक-या मार्फत च्या विनंती गांभिर्याने घेत तहसिलदार वरूण कुमार सहारे, भुमापनचे अधिकारी, मंड ळ अधिकारी जगधने, पटवारी पोतदार व पोलीसासह शुक्रवार दि २९ मे २०२० ला दोन्ही क प्रत नुसार मोजणी केली असता शेतकरी राजकुमार किसन काळे यांचे शेत खसरा न ५० आराजी ४.१३ हे आर मोजुन उत्तरेश असलेली २७ मी रूंद पुर्व पश्चिम ४२० मी लांब पांधन रस्त्याचे अतिक्रम झाल्याचे खातरजमा करून सदर अतिक्रमण हटविण्यात आ ले. जे.सी बी ने नाली करून सरकारी हद कायम केली.

पांधनच्या उत्तरेस खस रा क्र ४९ मध्ये स्मशान भुमि असल्याने सरकारी पांधन रस्त्यावरील अतिक्रमण काढुन सरकारी जागा गावक-यांना सार्वजनिक उपयोगा करिता मोकळी करून दिल्याने गावक-यांनी आंनद व्यकत केला. पुरणदास तांडेकर व गावक-यांनी तहसिलदार मा. वरूण कुमार सहारे, भुमि अभिलेख अधिकारी, मंडळ अधिकारी, पटवारी पोतदार व पोलीसांचे आभार व्यकत केले.