Published On : Tue, Dec 7th, 2021

हनुमान नगर जलकुंभ शट डाउन तसेच नंदनवन (राजीव गांधी ) जलकुंभ स्वच्छता डिसेंबर ९ ला,

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी हनुमान नगर जलकुंभा च्या आऊट लेट वर ६०० मी मी व्यासाचा फ्लोव मीटर लावण्याकरिता तसेच काही अत्यावश्यक असलेली तांत्रिक कामे करण्याकरिता हनुमान नगर जलकुंभाचे ९ तासाचे शट डाउन दिनांक ९ डिसेंबर २०२१ ला घेण्याचे ठरविले आहे. हे शट डाउन सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६.३० पर्यंत घेण्यात येईल .ह्या कामामुळे हनुमान नगर जलकुंभाचा संध्याकाळचा पाणीपुरवठा बाधित राहील

पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग:
हनुमान नगर जलकुंभ: हनुमान नगर, चंदन नगर, वकील पेठ, सोमवारी वसाहत, चंदन नगर वसाहत, चंदन नगर रॅम मंदिर भाग, हनुमान नगर मेडिकल चौक, प्रेम गली , चंदन नगर गार्डन , रॉयल गली आणि इतर भाग.

नंदनवन (राजीव गांधी ) जलकुंभ स्वच्छता डिसेंबर ९ ला, नंदन वन (जुने) जलकुंभ -१० ला आणि नंदनवन (नवीन) जलकुंभ -डिसेंबर १३ ला स्वच्छता
नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी आपल्या स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करण्याच्या वचनबद्धता अनुसरत दरवर्षीप्रमाणे यंदाही जलकुंभ स्वच्छता मोहीम सुरु केली आहे. मनपा-OCW दरवर्षीच नागपुरातील सर्व जलकुंभ वर्षातून एकदा स्वच्छता करीत असते. हि परंपरा मनपा-OCW ने २०१२ पासून नित्यनियमाने सुरु केलेली आहे. *नेहरू नगर झोन अंतर्गत . नंदनवन (राजीव गांधी ) जलकुंभ स्वच्छता डिसेंबर ९ ला, नंदन वन (जुने) जलकुंभ – डिसेंबर १० ला आणि नंदनवन (नवीन) जलकुंभ -डिसेंबर १३ ला स्वच्छता करण्यात येतील .जलकुंभ सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान स्वच्छ करण्यात येतील. या जलकुंभ स्वच्छतेमुळे तेथील भागात पाणीपुरवठा बाधित राहील. ह्या जलकुंभ स्वच्छता शटडाऊन दरम्यान टँकर्सद्वारेही पाणीपुरवठा होणार नसल्याने मनपा-OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

९डिसेंबर (गुरुवारी ) रोजी नंदनवन जलकुंभावरून पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग:
नंदनवन जलकुंभ : गुरुदेव नगर, संमिरे ले आउट, कबीर नगर, बापू नगर, प्रेम नगर, संतोषी माता नगर, सिंधीबान ताजबाग स्लम हरिपूर नगर

१० डिसेंबर (शुक्रवारी ) रोजी नंदन वन (जुने) जलकुंभावरून पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग:
नंदन वन (जुने) जलकुंभ: नंदनवन ले आउट , प्रशांत नगर, कीर्ती नगर, कवेलू वसाहत, वेंकटेश नगर आणि LIG & MIG सोसायटी

१३ डिसेंबर (सोमवारी ) रोजी नंदनवन (नवीन) जलकुंभावरून पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग*:
नंदनवन (नवीन) जलकुंभ: नवीन डायमंड नगर, शेष नगर, शक्ती माता नगर , श्रीकृष्ण नगर, वृन्दावन नगर, गोपालकृष्ण नगर, शिवणकर नगर स्लम

ह्या जलकुंभ स्वच्छता आणि शटडाऊन दरम्यान टँकर्सद्वारेही पाणीपुरवठा होणार नसल्याने मनपा-OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

अधिक माहिती करिता मनपा-OCW टोल फ्री नंबर १८००२६६९८९९ वर नागरिक केव्हाही संपर्क करू शकतात.