Published On : Wed, Feb 14th, 2018

​​हाफीज धत्तुरे यांच्या निधनाने समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले: खा. अशोक चव्हाण

मुंबई​: काँग्रेस नेते व मिरजेचे माजी आमदार हाफीज धत्तुरे यांच्या निधनाने सर्वसामान्यांच्या विकासासाठी समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले, अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

हाफिज धत्तुरे यांच्या निधनावर दुःख करताना खा. चव्हाण म्हणाले की, हाफीज धत्तुरे आयुष्यभर काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ राहिले. विधानसभा सदस्य म्हणून सांगली व मिरजेच्या विकासात त्यांनी मोलाचे योगदान दिले. साध्या राहणीमुळे आम आदमीचा आमदार अशी त्यांची ओळख होती. आपली आमदारकी पणाला लावून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले.

Advertisement

हाफीज धत्तुरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी धत्तुरे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement