
नागपूर: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय निर्मित ‘वेबचर्चा संवाद’ कार्यक्रमात केंद्रीय खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे सदस्य जयप्रकाश गुप्ता यांची ‘हर घर तिरंगा’ या विषयावर उद्या विशेष मुलाखत प्रसारीत होणार आहे. ही मुलाखत https://youtu.be/Vbn५१४gzG-Y या मोबाईल लिंकवर गुरुवार रोजी 4 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 4 वाजता प्रसारीत होईल.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनात जिल्हा माहिती कार्यालय व महाआयटी यांच्यामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम यु-टयुब, वेबेक्स व फेसबुकवर लाईव्ह असणार आहे. दुपारी 4 वाजता सुरु होणाऱ्या अर्ध्यातासाच्या चर्चेत काही प्रश्न विचारता येईल. यासाठी वेबेक्स लिंक जाहीर केली जाणार आहे.
‘हर घर तिरंगा’ या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केंद्रीय खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे सदस्य जयप्रकाश गुप्ता या कार्यक्रमातून करणार आहेत. या कार्यक्रमात नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
रेशीमबाग परिसर के एक भोजनालय में हुई चोरी... #nagpurnews #crime #newsupdate #accusedarrested...
जीजा की गंदी नज़र ने तोड़ा रिश्तों का भरोसा... #nagpurnews #crime #newsupdate...
नागपुर में गिटार टीचर पर पोक्सो का केस #nagpurnews #crime #newsupdate #accusedarrested...
शादी में गया परिवार, पीछे से घर साफ ! #nagpurnews #crime #newsupdate...
₹3.56 करोड़ से ₹125 करोड़! मुआवज़ा घोटाले का बड़ा दावा #newsupdate #news...
ऑपरेशन थंडर में दो एमडी तस्कर गिरफ्तार #nagpurnews #crime #md #taskar #newsupdate








