Published On : Sat, Oct 21st, 2017

गुजरात निवडणुक: काँग्रेसने मागितली हार्दिकची साथ, 125 जागा जिंकणार असल्याचा दावा

Advertisement

Hardik Patel 1
अहमदाबाद: गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने पाटीदार आंदोलकांचा नेता हार्दिक पटेलला सोबत येण्याचे निमंत्रण दिले आहे. हार्दिक व्यतिरिक्त काँग्रेसने ठाकोर समुदायाचे नेते अल्पेश, दलित लीडर जिग्नेश मेवानी यांना सोबत घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गुजरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भारत सिंह सोलंकी यांनी सांगितल्याप्रमाणे, या नेत्यांनी काँग्रेसशी हात मिळवल्यास काँग्रेस सहज 182 पैकी 125 जागांवर निवडून येईल. विधानसभा निवडणुकीत हार्दिक पटेलने आमच्यासोबत यावे. त्यांना तिकीट देखील दिले जाईल असे काँग्रेसने म्हटले आहे.

हार्दिकने दिली अशी प्रतिक्रिया?
हार्दिक पटेलने सांगितल्याप्रमाणे, “घटनेचा विचार केल्यास मी निवडणूक तर लढवू शकत नाही. आणि असेही निवडणूक लढवणे माझे लक्ष्य नाही. तरीही, भाजप विरोधात एकजूट होण्यावर माझा विश्वास आहे. ही केवळ भाजप विरुद्ध काँग्रेस अशी निवडणूक नाही. ही गुजरातच्या 6 कोटी जनतेची निवडणूक आहे.”

Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement