Published On : Fri, Dec 9th, 2022

गुजरातचा निकाल ऐतिहासिक आणि विरोधकांचे डोळे उघडणारा

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिपादन

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने मिळविलेला विजय ऐतिहासिक असून विरोधकांचे डोळे उघडणारा आहे. गुजरातच्या जनतेने पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजींच्या विकासात्मक राजकारणाला पाठिंबा दिला असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

गुरुवारी ते माध्यमांशी बोलत होते. गुजरातमध्ये प्रवास करताना भाजपाचा मोठा विजय होणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितले होते हे विशेष. राहुल गांधी कधीही देशात काँग्रेसचे नेते तो म्हणून पुढे येऊ शकत नाही. काँग्रेसला त्यांच्या नेतृत्वात विजय मिळू शकत नाही, असा दावा त्यांनी केला.

भाजपाच्या एतिहासिक विजयाबद्दल त्यांनी गुजरातच्या जनतेचे आभार मानले. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, गुजरातच्या जनतेने पंतप्रधान मोदींवरचा विश्वास कायम आहे. जगात भारताला महाशक्तीशाली बनवण्याच्या मोदींच्या प्रयत्नांचे हे यश आहे. गुजरातमध्ये भाजपानं केलेल्या कामांना जनतेनं दिलेली ही पोचपावती आहे. आता तरी या निकालातून विरोधकांचे डोळे उघडतील.

आपने खूप मोठ्या मोठ्या घोषणा केल्या होत्या मात्र त्यांना यश मिळताना दिसत नाही काँग्रेस कमकुवत झाली आहे राहुल गांधी यांचा प्रभाव दिसत नाही त्यांनी कितीही यात्रा केल्या तरी त्यांची नीतिमत्ता योग्य नाही त्यांच्याकडे विजन नाही. गुजरात मध्ये पराभव होईल हे त्यांना माहीत होते, त्यामुळे त्यांनी गुजरातमध्ये प्रचार केला नाही असाही टोला लगावला.

संजय राऊत यांनी विधायक कामे करावीत
संजय राऊत यांना धमकीचे फोन आले असेल, तर त्यांनी पोलिसांचे संरक्षण मागावे. पोलिसात तक्रार करावी. मात्र ते मीडियासमोर येऊन बोलत आहेत. त्यांनी संरक्षण मागितले तर देवेंद्र फडणवीस संरक्षण देण्यात सक्षम आहे. ते रोज लोकांना नेत्यांना शिव्या शाप देतात राऊत यांनी वाहियात बोलणे टाळावे. ते तीन महिने जेलमध्ये राहून आले आहे त्यामुळे कैद्यांची जशी भाषा असते तशी भाषा ते वापरतात. संजय राऊत विधायक काम करण्याचा सल्लाही बावनकुळे यांनी यावेळी दिला.