Published On : Sun, Sep 15th, 2019

विद्यासागर कला महाविद्यालयात डिजिटल इंडिया वर मार्गदर्शन

रामटेक: विद्यासागर कला महाविद्यालय रामटेक येथे विद्यार्थ्यांसाठी एम के सि ल च्या माध्यमातून डिजिटल इंडिया च्या संकल्पनेवर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले. डाटा टेक कॅम्पटर रामटेक च्या सहकार्याने महाविद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

एमकेसिल च्या वतीने दया कटरे यांनी विद्यार्थ्यांना आजच्या पिढीला पारंपरिक पद्धतीने शिक्षणासोबतच कॅम्पटर, इंटरनेट आणि ऑनलाईन मार्गांच्या माध्यमातून घरबसल्या अर्थांजन कसे करता येते हे विविध उदारहरणांच्या माध्यमातून समजावून सांगितले.

Gold Rate
18 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,28,500 /-
Gold 22 KT ₹ 1,19,500 /-
Silver/Kg ₹ 1,70,500/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

रोशन वासनिक यांनी अर्थांजनासाठी आज कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत हे समजावून सांगितले. या प्रसंगी डाटा – टेक कम्प्यूटर चे संचालक , सुषमा मर्जीवे,नंदा मर्जिवे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता डॉ. गिरीश सपाटे , प्रा. अनिल दाणी, प्रा. रवींद्र पानतावणे यांनी प्रयत्न केले.

Advertisement
Advertisement