Published On : Sat, Jul 29th, 2017

कामठी येथे हातमाग विणकरांसाठी गारमेंट झोन बनविणार : पालकमंत्री

Advertisement

Bawankule
नागपूर:
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज रविभवन येथील सभागृहात विविध विकासकामांची आढावा बैठक घेऊन नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्याबाबत संबंधितांना निर्देश दिलेत.

कामठी येथे हातमाग विणकरांसाठी गारमेंट झोन बनविण्यात यावे, पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेअंतर्गत कामठीमध्ये ग्राऊंड प्लस टू अंतर्गत 364 घरे तर जी प्लस एट अंतर्गत 864 घरे हातमाग विणकरांसाठी बनविण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यावेळी दिले. बऱ्याच वर्षांपासून हातमाग विणकरांचा जागेचा प्रश्न होता. गारमेंट झोनच्या निर्मितीमुळे हा प्रश्न निकाली निघणार आहे.

ग्राम पंचायत भिलगाव येथील नागरिकांना त्यांचा सोसायटीमध्ये जाण्या-येण्यासाठी पक्का रस्ता व पथदिव्यांची सोय नाही. नागरिकांना पक्का रस्ता, पथदिवे आणि सुरळीत पाणी पुरवठा सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत भीलगावच्या सरपंचांना यावेळी निर्देश देण्यात आले आहेत. तसेच या विकासकामासाठी दलितवस्ती विकास निधी उपयोगात आणावा.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कामठी इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये 15 ते 20 वर्षापासून नागरिकांना इंडस्ट्रीकरिता जमिनीचे पट्टे देण्यात आले होते. परंतू ज्या पट्टयावर अद्याप उद्योग सुरु झाले नाहीत, असे पट्टे रद्द करण्याचे यावेळी निर्देश देण्यात आले.

मौजा बिडगांव येथे पेरी अर्बन योजनेंतर्गत नळ योजनेचे काम सुरु करण्याकरिता नागपूर सुधार प्रन्यासने 15 वर्षाकरिता 2.15 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी देण्याकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे आता कापसी बुर्ज आणि तरोडी खूर्द या दोन गावांचा अनेक वर्षापासून असणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

यावेळी पारशिवनी येथील सरकारी देशी दारुचे दुकान, स्वेच्छा निवृत्ती योजनेअंतर्गत वीज वितरण केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना नोकरीमध्ये सामावून घेणे, दिघोरी रेल्वे फाटक आदींबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी मनपा आयुक्त अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement