Published On : Tue, Oct 6th, 2020

पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांचा दौरा

Advertisement

भंडारा : राज्याचे सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम हे 8 ऑक्टोबर रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.

8 ऑक्टोंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता मौजा जाख (मुजबी) येथे आगमन व गणेशपूर शेतकरी उत्पादक कंपनीच्या धान्य गोदामाचे उद्घाटन, दुपारी 12 वाजता जिल्हा परिषद सभागृह भंडारा येथे कोविड-19 संदर्भात आढावा बैठक. दुपारी 1 वाजता कोविड केअर सेंटरला भेट.

Gold Rate
20 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,47,200/-
Gold 22 KT ₹ 1,36,900 /-
Silver/Kg ₹ 3,10,400 /-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दुपारी 3 वाजता नगरपरिषद भंडारा अंतर्गत म्हाडा कॉलनी येथे विकास कामाचे भुमीपुजन. 4.30 वाजता मौजा मिरेगाव लाखनी येथे सुनील तिरमारे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट, 5.30 वाजता कन्हाळगांव (लाखांदूर) येथे भेट व कार्यक्रमास उपस्थिती, सोईनुसार नागपूरकडे प्रस्थान.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement