Published On : Sat, May 31st, 2025
By Nagpur Today Nagpur News

मनपातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन

Advertisement

नागपूर, : नागपूर महानगरपालिकेतर्फे लोककल्याणकारी राज्य चालवणाऱ्या राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या दालनात आयोजित छोटेखाणी समारंभात मनपाचे मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी मनपाचे जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, श्री. अमोल तपासे, शैलेश जांभूळकर, स्वच्छता विभागाचे श्री. लोकेश बासनवार, श्री. गजानन जाधव, श्री. प्रवीण वानखेडे, श्री. प्रमोद गणवीर अग्निशमन विभागाचे जवान व इतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.