Published On : Fri, May 14th, 2021

महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन

नागपूर : आद्य समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात उपायुक्त श्रीकांत फडके यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

उपायुक्त चंद्रभान पराते, नायब तहसीलदार आर. के. दिघोळे तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी यावेळी त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

जिल्हाधिकारी कार्यालय
जिल्हाधिकारी कार्यालयातही जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.