Published On : Mon, Oct 11th, 2021

जोगेंद्रनाथ मंडल ह्यांना अभिवादन

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बंगालमधून संविधान सभेत निवडून पाठविणारे महाप्राण जोगेन्द्रनाथ मंडल यांचा 53 वा स्मृती दिवस. बहुजन समाज पार्टीने मान्यवर कांशीरामजी सार्वजनिक वाचनालय व दक्षिण नागपूर बसपाचे जनसंपर्क कार्यालय न्यू कैलासनगर येथे संपन्न झाला.

स्मृती दिन समारोहाला युवा अभ्यासक व प्रसिद्ध वक्ते ऍड अतुल पाटील प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. बसपाचे प्रदेश कार्यालयीन सचिव उत्तम शेवडे यांच्या अध्यक्षतेखाली हा स्मृती दिन समारोह संपन्न झाला.

यावेळी वक्त्यांनी जोगेंद्रनाथ मंडल व बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान सभेतील एकूण प्रवासावर कांशीरामजी ह्यांनी टाकलेल्या प्रकाशावर यावेळी चर्चा करण्यात आली. बाबासाहेबांना संविधानसभेत जाण्यापासून थांबविणारे काँग्रेस चे नेते अंतीम समयी कसे वागले याचा धावता आढावाही याप्रसंगी घेन्यात आला.


बंगाल च्या नमोशूद्रा लोकांचे व जोगेंद्रनाथ मंडलाचे आंबेडकरी लोकांसोबतच भारतावर खूप उपकार असल्याचे मनोगत या प्रसंगी वक्त्यांनी व्यक्त केले. सोबतच त्या नमोशूद्रा लोकांवर भारत सरकार कडून झालेल्या व आजही होत असलेल्या अन्यायाची चर्चा करुन भारत सरकारच्या चुकीच्या नितीवर नाराजी व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी शेवडे यांनी तर समारोप शंकर थुल यांनी केला. कार्यक्रमाला बसपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सदानंद जामगडे, प्रवीण पाटील, शामराव तिरपुडे, वर्षाताई वाघमारे आदी प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.