Advertisement
नागपूर: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले.
नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी,नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके,महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, अधीक्षक अभियंते नारायण आमझरे,अविनाश शहारे,हरीष गजबे,अजय खोब्रागडे,अमित परांजपे,कार्यकारी अभियंते समीर शेंदरे,राजेश घाटोळे,प्रफुल्ल लांडे,सहाय्यक महाव्यवस्थापक प्रदीप सातपुते,सहाय्यक औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे,प्रणाली विश्लेषक प्रवीण काटोले,उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.