Published On : Wed, Apr 14th, 2021

अखिल भारतीय पासी समाज तर्फे बाबा साहेबांना अभिवादन

नागपुर -भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर यांची १३० वी, जयंती साजरी करण्यात आली. अखिल भारतीय पासी समाजाचे राष्ट्रीय ज्येष्ठ उपाध्यक्ष दलित मित्र श्रीराम बहोरिया यांच्या अध्यक्षते खाली महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साजरी करण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर च्या फोटोला श्रद्धांजली वाहताना दलित मित्र श्रीराम बहोरिया म्हणाले की, अन्यायाविरूद्ध गर्जना करणाऱ्या नेत्याने गरीब लोकांना संघटित, लढा, अन्यायविरूद्ध लढा देण्याचे म्हटले.

मंचाचे संचालन मनीष बहोरिया यांनी केले, हा कार्यक्रम इंदिरा भवनच्या प्रांगणात झाला. कमल वर्मा, किशोर बहोरिया, बलराज बहोरिया, सुभाष बहोरिया, मनोरमा सूर्यवंशी, संजय गुजर, अभिषेक बहोरिया, राहुल बहोरिया, कमल गुप्ता आदींची कार्यक्रमाला उपस्थित होती.