Published On : Tue, Oct 5th, 2021
By Nagpur Today Nagpur News

राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री जयंतीनिमित्त मनपातर्फे अभिवादन

Advertisement

नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शनिवारी (ता. २) सकाळी व्हेरायटी चौक येथे पुतळ्याला माल्यार्पण केले.

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून अभिवादन केले.

Gold Rate
13 May 2025
Gold 24 KT 94,300/-
Gold 22 KT 87,700/-
Silver/Kg 97,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्हेरायटी चौक सीताबर्डी येथील गांधीजींच्या पुतळ्याला तर लक्ष्मीभुवन चौक धरमपेठ येथील माजी पंतप्रधान लाल बहादुरशास्त्री यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त राधाकृष्णन बी., स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., झोन सभापती सुनील हिरणवार, नगरसेविका वर्षा ठाकरे, नगरसेविका डॉ. परिणिता फुके, संगीता गिऱ्हे, रूपा राय, उज्ज्वला शर्मा, नगरसेवक अमर बागडे, मधुकर कुकडे, राजेंद्रसिंग भंगु आदी उपस्थित होते.

मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव स्मृती स्थायी समिती सभागृहात महापौर दयाशंकर तिवारी आणि विरोधी पक्षनेता तानाजी वनवे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमांना मालार्पण करून अभिवादन केले. यावेळी धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन, रवींद्र भेलावे, विधी अधिकारी व्यंकटेश कपले, वाहतूक अभियंता श्रीकांत देशपांडे, कार्यकारी अभियंता कृष्णकुमार हेडाऊ आदी उपस्थित होते.

इतवारी येथील गांधीपुतळ्याला आमदार गिरीश व्यास, आमदार विकास कुंभारे, आमदार प्रवीण दटके, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक, नगरसेविका विद्या कन्हेरे, नगरसेवक किशोर जिचकार, माजी आमदार यादवराव देवगडे यांच्या उपस्थितीत माल्यार्पण करण्यात आले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आपला आदर्श मानून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात स्वच्छता अभियान सुरू केले. गांधींजींचे विचार आत्मसात करून या देशाची युवा पिढी देशाला नव्या उंचीवर नेईल, असा विश्वास महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केला. माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जीवनावरही त्यांनी यावेळी प्रकाश टाकला.

Advertisement
Advertisement