Published On : Mon, Aug 2nd, 2021

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त मनपा तर्फे विनम्र अभिवादन

नागपूर : ‘जगेन तर देशासाठी, मरेन तर देशासाठी’ अशी परखड भूमिका मांडणारे, शाळेत न जाताही स्वतः विचाराने सुशिक्षित असणारे, पोवाडे, लोकनाट्य, कादंबऱ्या, कथासंग्रह इत्यादी साहित्याद्वारे समाजातील अंधश्रद्धा, जातीयता, साठेबाजी, सावकारी, वेठबिगारीविरुद्ध ज्यांनी आयुष्यभर लढा दिला, असे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दीक्षाभूमी चौक स्थित प्रतिमेला महापौर दयाशंकर तिवारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे’ हा नारा देऊन इंग्रजी जुलमी राजवटीविरुद्ध लढा देणारे अग्रणी नेतृत्व भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त गांधीसागर तलाव महाल येथील प्रतिमेला महापौर दयाशंकर तिवारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आमदार व माजी महापौर प्रवीण दटके, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक, नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम, नागेश सहारे, माजी सत्ता पक्षनेते संदीप जाधव, नगरसेविका सुमेधा देशपांडे, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, राजेश हाथीबेड, माजी नगरसेविका प्रभाताई जगनाडे, सारिका नांदुरकर, भाजप मध्य नागपूर अध्यक्ष किशोर पलांदूरकर, विनायक डेहनकर, सुधीर हिरडे, संजय फांजे, श्रीकांत (सोमू) देशपांडे, ब्रजभूषण शुक्ल, सुबोध आचार्य, विनायक पांढरीपांडे, चंदू गेडाम, अनिता काशीकर, नीरजा पाटील, शारदा गावंडे, ममता खोटपाल, अमरमरकर, सरोज पेशकर, प्रकाश हटवार व अन्य मान्यवर उपस्थित होते. मनपा प्रशासकीय इमारतीतील दालनात अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या तैलचित्रला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.