Published On : Fri, Sep 17th, 2021

केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे जयंती निमित्त म.न.पा.तर्फे अभिवादन

नागपुर: अस्पृश्यता, बालविवाह, हुंडा प्रथांना विरोध करणारे मराठी पत्रकार, ज्येष्ठ समाज सुधारक, कुशल वक्ते केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंती निमित्त नागपुर महानगरपालिके तर्फे शुक्रवारी उपमहापौर मनीषा धावडे व आयुक्त राधाकृष्णन बी यांनी म.न.पा.केन्द्रीय कार्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृह येथे प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

यावेळी उपायुक्त राजेश भगत, उपायुक्त विजय देशमुख, मनपाचे सामान्य प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त महेश धामेचा, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी आदी उपस्थित होते.