Advertisement
नागपूर: थोर समाज सुधारक, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्त म.न.पा.केन्द्रीय कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत येथील दालनात अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
यावेळी मुख्य अभियंता श्री. राजीव गायकवाड, उपायुक्त श्री. रविन्द्र भेलावे, उपायुक्त डॉ. गजेन्द्र महल्ले, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, सहा.जनसंपर्क अधिकारी अमोल तपासे आदी उपस्थित होते. तसेच कॉटन मार्केट येथील महात्मा फुले यांच्या पुतळयाला जनसंपर्क विभागाचे शैलेष जांभुळकर, मनपाच्या उपद्रव शोध पथकाचे जवान आणि अग्निशमन विभागाच्या जवानांनी माल्यार्पण करुन अभिवादन केले.