Published On : Sat, Oct 31st, 2020

महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त भाजपातर्फे अभिवादन

नागपूर, ता.३१: महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी तर्फे अभिवादन करण्यात आले. धरमपेठ येथील वाल्मिकी धाम येथे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव तथा मनपाचे विधी समिती सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन केले.

यावेळी मनपाचे सत्तापक्ष नेते संदीप जाधव, डॉ. आंबेडकर फाऊंडेशनचे उपाध्यक्ष अशोक मेंढे, नगरसेवक सुनील हिरणवार, नगरसेवक विजय चुटेले, माजी प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी, ॲड. राहुल झांबरे, सतीश सिरसवान, अजय करोसिया, अमित चिमोटे, सुनील शंकर, शशीकलाताई बावणे, नम्रताताई माकोडे, सुभाष बोरकर, नंदकिशोर महतो, राजू चव्हाण, नितीन वामन आदी उपस्थित होते.