नागपूर : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेच्या नव्या प्रशासकिय इमारतीमधील महात्मा ज्योतिबा फुले यांचे तैलचित्राला परिवहन समितीचे उपसभापती प्रवीण भिसीकर व बसपा पक्षनेते मो. जमाल व नगरसेविका श्रध्दा पाठक यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले तसेच फुले मार्केट स्थित महात्मा फुले यांच्या प्रतिमेला प्रभागाच्या नगरसेविका हर्षला साबळे यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी नगरसेवक किशोर जिचकार, अपर आयुक्त रवींद्र कुंभारे, सहा. आयुक्त महेश धामेचा, सहा. आयुक्त मिलींद मेश्राम, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, माजी बसपा पक्षनेता मुरलीधर मेश्राम, अभियंता महादेव मेश्राम, बाजार अधिक्षक मदन सुभेदार, शिवशंकर गौर व बहुसंख्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
Advertisement

Advertisement
Advertisement