Published On : Tue, Jan 23rd, 2018

नेताजी सुभाषचन्द्र बोस जयंती उपमहापौर व्दारा विनम्र अभिवादन


नागपूर: देश गौरव नेताजी सुभाषचन्द्र बोस यांच्या १२२ व्या जयंती निमित्त उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी सकाळी मानस चौक व सतरंजीपूरा स्थीत सुभाषचन्द्र बोस यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करुन नगरीच्या वतीने विनम्र अभिवादन केले.

या प्रसंगी पूर्व नागपूर चे आमदार कृष्णा खोपडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्र (बाल्या) बोरकर नगरसेवक महेश महाजन, नितीन साठवणे, नगरसेविका आभा पांडे, गोपाल मालोकर किशोर डवले, गणपत भद्रे, ओमप्रकाश कळमकर, शरद पडोळे, सुभाषचन्द्र बोसच्या वेशभुषामध्ये सर्जेराव गळपट, वसंतकुमार चौरसीया, रामगोवीन्द खोब्रागडे, देवानंद ओगले, सुनीता शेंडे आदी प्रामुख्याने उपस्थीत होते.