नागपूर : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, सरकारने अद्याप द्राक्ष उत्पादक बागायतदार शेतकऱ्यांचे पंचानामेदेखील केलेले नाहीत. प्रत्येक एकरामागे चार लाखाचा खर्च द्राक्ष उत्पादकांना करावा लागतो.
यंदा, एक रुपयाही भाव मिळत नसल्याची परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर द्राक्षाला एकरी एक लाख मदत द्यावी, अशी मागणी आमदार रोहित पवार आणि आमदार सुमन पाटील यांनी शुक्रवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केली. यादरम्यान पवार यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले.
मराठवाड्यात लाखो शेतकरी आत्महत्याचा विचार करत आहे. मात्र याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. ‘गेल्या वर्षीदेखील द्राक्षांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळालेली नाही. यावर्षीची परिस्थिती अजून बिकट आहे.
आमदार सुमन पाटील यासंदर्भात वारंवार सभागृहात बोलण्याचा प्रयत्न करताहेत. पण, त्यांना बोलू देण्यात येत नाही, असेही रोहित पवार म्हणाले.