कन्हान :- परिसरात नवदुर्गेच्या आश्विन नवरात्र महोत्सवाची सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडल पिपरी -कन्हान व्दारा भव्य कलश-कावड यात्रा कन्हान नदीतुंन भजन मंडळी,ढोल ताश्या, डी . जे च्या गर्जरात नव दुर्गा प्रतिमेचा शोभेयात्रेसह मातेचा जयघोष करीत कन्हान नगरीच्या मुख्य मार्गाने पिपरी नवदुर्गा मंदिरात पोहचुन विधिवत पूजा अर्चना सह घट स्थापना करून उत्सवाची सुरुवात कर ण्यात आली .
नवदुर्गेच्या आश्विन नवरात्र महोत्सवाची सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडल पिपरी -कन्हान व्दारा गुरूवार( दि२१) ला सकाळी १० वाजता भव्य कलश-कावड यात्रा कन्हान नदीतुंन पावन जल घेऊन महिला -पुरुष ,भजन मंडळी , ढोल ताश्या ,डी . जे च्या गर्जरात मातेचा जयघोष करीत भगवा ध्व्ज लहरावीत कन्हान नगरीच्या मुख्य मार्गाने बीकेसीपी शाळा, पोलीस स्टेशन, नगरपरिषद ,आंबेड कर चौक,अशोकनगर, शिवाजी नगर, धरमनगर पिपरी नवदुर्गा मंदिरात पोहचुन विधिवत पूजा अर्चना सह घट स्थापना करून उत्सवाची सुरुवात कर ण्यात आली.
नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून अश्विन नवरात्र महोत्सव साजरा करण्यात येईल. भव्य कलश-कावड यात्रेचे भाविक मंडळीने पाणीपाऊच ,फळ, प्रसाद वितरण करून स्वागत केले. याप्रसंगी मा. शरद डोणेकर, उपाध्यक्ष जि प नागपूर, मा शंकरभाऊ चहांदे नगराध्यक्ष कन्हान, मा डॉ मनोहर यांनी पाठक उपाध्यक्ष, मनोज कुरडकर, राजेंद्र शेंद्ररे, अजय लोंढे, नगरसेवक कन्हान-पिपरी प्रामुख्याने उपस्थित होते.
नवरात्र उत्सव करिता सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडल पिपरी -कन्हान प्रभाग क्र ३ चे कार्याध्यक्ष मा.प्रकाशजी जाधव , अध्यक्ष केसरीचंदजी खंगारे, सचिव श्री.प्रशांत बाजीराव मसार (युवा समाजीक सेवक ) राधेशाम भोयर, शालीक ठाकरे,बंडुजी येलमुले, राजु कुर्वे, चंद्रभान चौधरी,अशोक मेश्राम, भोला भोयर, सुभाष बावणे, खुशाल डांगे, गोपाल मसार,रोशन खंगारे, अशोक तिवाडे, बाला खंगारे,सुनिल ढोमणे, दिपक हांडे, उज्वल येलमुले, राहुल खांडेकर, शुभम खंगारे, गौरव भोयर, संजय गुडधे, विलास दुधबावणे,कुंदन रामगुंडे, संदीप भोस्कर,ज्योती येलमुले , अरूणा वानखेडे, कल्पना खंगारे,वर्षा रामगुंडे, पुष्पा खंगारे, शालु कावळे, माधुरी गांवडे, इंदिरा खांडेकर तसेच पदाधिकारी, सदस्य व समस्त भाविक गावकरी मंडळी परिश्रम करीत आहे.
मॉ जगदम्बा सेवा समिती रामनगर कन्हान
रामनगर गुरफुडे लेआऊट कन्हान येथील मॉ जगदम्बा मंदिरात बुधवार( दि.१०) ला दुपारी ४ वाजता विधीवत पुजा अर्चना सह धटस करूपना करून नवरात्रोत्सवाची सुरूवात करण्यात आली . नवदिवस शैक्षणिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नवरात्रोत्सवाकरिता मॉ जगदमम्बा सेवा समिती रामनगर कन्हान चे पदाधिकारी , सदस्य व भाविक मंडळी परिश्रम घेत आहेत.
जय शीतला माता मंदिर कन्हान -कांद्री
जय शीतला माता मंदिर कन्हान -कांद्री येथे सकाळी २ वाजता विधिवत पूजा अर्चना करून घट स्थापना करून उत्सवाची सुरुवात कर ण्यात आली. नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.उत्सवाकरिता मंदिर कमिटीचे पदाधिकारी , सदस्य दिलीप मरघडे ,संजय चौकसे, डॉ अनिल मंगतानी, जंयतीलाल पटेल, अशोक खैरकर, वामन देशमुख, गि-हे काका, प्रकाश ढोके, वंसता राऊत, नरेश शेळके, बादल पेंटर, प्रितेश मेश्राम, किशोर बावणे, राजकुमार साखरे, परमेश्वर नांदूरकर, संजय मोहोड, चंद्रशेखर कळमदार, प्रमोद मानकर, अनुप मोटवानी व समस्त गावकरी मंडळी परिश्रम करीत आहे .
सार्वजनिक दुर्गामंदिर हरिहर नगर कांद्री.
नवदुर्गेच्या आश्विन नवरात्र महोत्सवाची सार्वजनिक दुर्गा मंदिर देवस्थान कांद्री वार्ड क्र. १ व्दारे विधिवत पूजा अर्चना करून घट स्थापना करून उत्सवाची सुरुवात कर ण्यात आली .उत्सवाकरिता मंदिर कमिटीचे पदाधिकारी , सदस्य ,गावकरी मंडळी परिश्रम करीत आहे.