
नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित खासदार भजन स्पर्धेची महाअंतिम फेरी आज, शनिवार दि. २१ फेब्रुवारी रोजी दुपारी १ ते सायं. ५ या वेळेत शिक्षक सहकारी बँक सभागृह, गांधीसागर महाल येथे रंगणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता होणाऱ्या बक्षीस वितरण सोहळ्यात गडकरी यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
या सोहळ्यास जनार्दनपंत बोथे (श्री गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज मोझरी) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. यावर्षी त्यांना पद्मश्री जाहीर झाल्याबद्दल खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे त्यांचा विशेष सत्कारही करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते, आमदार प्रवीण दटके, आमदार संदीप जोशी यांच्यासह समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष राजेश बागडी आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित या स्पर्धेला यंदा नागपूरातील तब्बल ७५४ भजनी मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. विठ्ठल भक्तीचा जागर घडवणाऱ्या या स्पर्धेत ज्येष्ठ वयोगटातून १४ तर युवा वयोगटातून ७ असे एकूण २१ रोख पुरस्कार व सन्मानचिन्हे प्रदान करण्यात येणार आहेत.
स्पर्धेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून भजनी मंडळांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन डॉ. श्रीरंग वराडपांडे यांनी केले आहे.
nagpur student protest delhi lathi charge
प्लेट हटाने को कहा तो भड़के पड़ोसी! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #news #Attack...
चाकू की नोक पर लूटपाट! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #NewsUpdate #Police #KnifeAttack #Robbery
लकड़गंज में दिनदहाड़े चोरी की कोशिश नाकाम #NagpurNews #Crime #Theft #Chor #HindiNews...
कन्हान में नशे की ‘काली दुकान’ पर पुलिस का छापा! #NagpurNews #Drug...
नागपुर में अन्ना गैंग का आतंक! NagpurNews #AnnaGang #Theft #Crime #CCTV #LatestNews...




