Published On : Mon, Feb 19th, 2024
By Nagpur Today Nagpur News

सरकारने २० तारखेला भूमिका जाहीर करावी अन्यथा…; मनोज जरांगे पाटलांचा इशारा

जालना : मराठा आरक्षणाबाबत सरकारने उद्या विशेष अधिवेशन बोलावले असून, त्यापूर्वी मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद आपली भूमिका मांडली. ओबीसीला धक्का लागत नाही, आम्ही ओबीसीमध्ये आहोत. सरकारला सगेसोयरेची अंमलजावणी करावी लागेल, त्यांना चार महिन्यांचा वेळ सगेसोयऱ्याची अंमबजावणीसाठी दिले होते. त्यामुळे 20 तारखेला सरकारची भूमिका कळेल, अन्यथा आमची देखील 21 तारखेच्या आंदोलनाची दिशा ठरली असल्याचा” इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

उद्या जो कायदा होईल त्याचा आनंद व्यक्त केला जाईल. मोजक्या लोकांना स्वतंत्र आरक्षण हवे आहेत, मात्र, कोट्यावधी मराठ्यांना 50 टक्क्याच्या आतमध्ये ओबीसीतून आरक्षण हवं आहे. त्यामुळे, 20 फेब्रुवारीला लक्षात येईल की, सगेसोयरे अध्यादेशाची अंमबजावणी सरकार करणार आहे की नाही,असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Gold Rate
14 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,200 /-
Gold 22 KT ₹ 93,200 /-
Silver/Kg ₹ 1,16,100/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मराठा आमदारांनी समाजाच्या बाजूने बोलणे गरजेचे-
सर्व पक्षातील मराठा आमदारांनी समाजाच्या बाजूने बोलावं. नाहीतर ते मराठा विरोधी ठरतील. करोडो मराठ्यांच्या नजरेतून पडू नका. मराठ्यांचा अधिकार आहे तुमच्यावर, त्यामुळे तुम्हाला बोलावं लागेल, नाहीतर तुम्ही मराठा विरोधी आहेत. ओबीसी नेते ओबीसी बांधवांची जाण तरी ठेवतायेत, तस मराठा आमदारांनी मराठांच्या बाजूने बोलावं. आम्ही 21 तारखेची तयारी केली असून, 20 ला काय होते हे अगोदर पाहणार आहोत.

Advertisement
Advertisement