Published On : Thu, Sep 14th, 2023
By Nagpur Today Nagpur News

सरकार मराठा आरक्षणाबाबत संवेदनशील… ‘त्या’ व्हिडीओवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया

Advertisement

मुंबई : मराठा आरक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संभाषणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.मुख्यमंत्री शिंदे त्यात असं म्हणतात की आपण बोलून मोकळं व्हायचे. यावरून विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत स्पष्टीकरण दिले आहेत.

मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकार परिषदेपूर्वी आपला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा माईकवरील संवाद ‘सोशल मीडीया’वरून चुकीच्या पध्दतीने संपादित करुन फिरविणे अत्यंत खोडसाळपणाचे आहे.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासून संवेदनशील असून कायद्याच्या चौकटीत बसेल असे आरक्षण देण्याबाबत सरकार प्राधान्याने काम करीत आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत पहिल्यांदाच अशा सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलावून या विषयी त्यांचे एकमत घेण्यात आले आहे.

शासनाने इतकी चांगली भूमिका घेतली असतांना मुद्दामहून काही विरोधक खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत हे अतिशय निंदनीय आहे. आमच्या एकमेकांमधील संवादाची मोडतोड करून संपादित करून दाखवून या घटकांनी जाणीवपूर्वक निंदनीय कृत्य केले आहे. शासन एकीकडे या संवेदनशील विषयावर ठोस भूमिका आणि निर्णय घेत आहे. अशा पार्श्वभूमीवर समाजात सोशल मीडियातून गैरसमज निर्माण करण्याचा कृत्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे, मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Advertisement
Advertisement