नवी दिल्ली: राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज सकाळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
१७, अकबर रोड येथे संपन्न झालेल्या बैठकीत, राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी महाराष्ट्र राज्याच्या ‘कायदा व सुव्यवस्थे’ बद्दलच्या सद्यस्थितीबाबत श्री. सिंह यांना अवगत केले.
राज्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री श्री. सिंह यांना यावेळी दिली.