Published On : Fri, Jun 26th, 2020

कामठीत नायजेरिया रिटर्न सह एक सैनिकही कोरोना पॉजिटिव्ह आढळला

Advertisement

कामठी :-सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी कामठी तालुका प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेण्यात येत असली तरी लॉकडाउन 1 लागू झाल्या पासून बाहेरुन येणाऱ्याची संख्या ही दिवसेंदिवस वाढीवर असल्याने विविध भागातून आलेले रिटर्न नागरिक हे कोरोनाबधित आढळून आल्याने तालुक्यात कोरोनाबधित रुग्णांची संख्या ही वाढीवर आहे.यानुसार कामठी शहराला लागून असलेल्या येरखेडा ग्रा प हद्दीतील भूषण नगर परिसरात नायजेरिया रिटर्न आलेला 59 वर्षोय इसम हा कोरोना पॉजिटिव्ह आढळला तसेच कामठी कॅन्टोमेंट हद्दीत येणाऱ्या उंटखाना ला लागून असलेल्या सैन्य फायरिंग रेंज मध्ये कार्यरत असलेला एक 32 वर्षोय सैनिक कोरोना पॉजिटिव्ह आढळल्याचे आज सकाळी 8 वाजता निष्पन्न झाले.यानुसार आज 25 जून ला कामठी शहरात एकाच दिवशी दोन रुग्ण हे कोरोना पॉजिटिव्ह आढळल्याने सर्वत्र हळहळ करण्यात येत आहे.

प्राप्त माहिती नुसार येरखेडा ग्रा प हद्दीत येणाऱ्या भूषण नगर रहिवासी 59 वर्षीय आढळलेला कोरोना बाधित रुग्ण हा नायजेरिया येथे कार्यरत असून कामठी ला येण्यासाठी नायजेरिया हुन बेंगलोर ला येऊन कार ने कामठी ला काल रात्री 1 वाजता भूषण नगर ला आले असता याला कोरोनाची लागण झाल्याची कुणकुण लागताच यांनी त्वरित सकाळी 6 वाजता नागपूर च्या मेयो इस्पितळात केलेल्या तपासणीत कोरोनाबाधित आढळून आले असता वेळीच तिथे उपचारार्थ दाखल झाले .याची माहिती तहसीलदार अरविंद हिंगे यांना कळताच तहसिलदार अरविंद हिंगे, बीडीओ सचिन सूर्यवंशी, नायब तहसीलदार रणजित दुसावार, नगर परिषद मुख्याधिकारी रमाकांत डाके, वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खानुनी, आरोग्य विस्तार अधिकारी दिघाडे, माजी सरपंच मनीष कारेमोरे व आरोग्य पथकांनी त्वरित भूषण नगर गाठून सदर परिसर प्रतिबंधक करने व खबरदारी घेण्याच्या उद्देशाने भूषण नगर गाठले असता सदर कोरोना बाधित आलेला रुग्ण हा त्यांच्या विश्रांती गृह असलेल्या ठिकाणी आला होता तर मूळचे घर हे नया गोदाम कामठी ला आहे मात्र कोरोना ची लागण संदर्भात काळजी घेण्याच्या उद्देशाने स्वगृही गेला नव्हता यावर या रुग्णाच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्या वाहनचालक, कुटुंबीय सदस्य तसेच ज्या कारणे प्रवास करून ती कार जिथे धुतली त्या वॉशिंग केंद्रा चे दोन कर्मचारी असे एकूण 7 सदस्यांना पाचपावली येथील संस्थात्मक विलीगिकरण कक्षात पुढील दहा दिवसासाठी हलविण्यात आले.

Gold Rate
Sept 10,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 54,700 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,39,700/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सैन्य विभागाच्या फायरिंग रेंज मध्ये आढळलेला कोरोनाबधित हा सैनिक नुकतेच काही दिवसांपूर्वी पुणे जिल्यातील तुर्की वरून विभागोय कामकाज आटोपून इतर पाच लोकांसह शास्कोय वाहनाने कामठी कॅन्टोमेंट परिसरात आले असता या सहाही सैनिकांना काळजी घेण्याच्या उद्देशाने एका विशेष खोलीत मागिल चार दिवसांपासून कोरोनटाईन करण्यात आले होते या सहा मधून एका सैनिकाला कोरोनाचे लक्षण आढळताच त्वरित त्याची कामठी मिलिटरी हॉस्पिटल येथे नेऊन कोरोनाची तपासणी केली असता रिपोर्ट अहवाल हा पॉजिटीव आले असता त्याला पुढील उपचारार्थ कामठी मिलिटरी हॉस्पिटल च्या कोविड सेंटर मधील विलीगिकरन कक्षात सुरक्षित ठेवण्यात आले आहे तसेच सोबत असलेल्या त्या ।पाच सैनिकांचे सुद्धा घश्याचे नमुने घेण्यात आले असून यांना सुदधा कामठी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

कामठी तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्णांची आतापर्यंत ची आकडेवारी बघितली असता एकूण 21 रुग्ण हे कोरोना बाधित आढळले त्यातील 12 रुग्ण हे बरे होऊन स्वगृही परतले आहेत तर यातील 9 रुग्ण हे कोरोनाबधित आहेत ज्यामध्ये महादुला चा एक, कवठा येथील 1, येरखेडा ग्रा प हद्दीतील रामकृष्ण सोसायटी व भूषण नगर येथील प्रत्येकी 1, खैरी गावातील 3 मजूर, गांधीनगर कामठी चा 1 चा समावेश आहे तर यांच्या प्रत्यक्ष , अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्या 43 लोकांना संस्थात्मक विलीगिकरण करण्यात आले तसेच खबरदारी घेण्याच्या उद्देशातून 360 च्या वर नागरिक गृह विलीगिकरन आहेत.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.