नागपूर – कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी बकरी ईद साध्या पध्दतीने साजरी करण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने, बकरी ईद (ईद-उल-अजहा) दिनांक 01 ऑगस्ट 2020 (शनिवार) रोजी असून या सणा निमित्ताने मुस्लीम बांधवाकडून लहान- मोठया जनावरांची कुर्बानी करण्याची प्रथा आहे.
कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी साध्या पध्दतीने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार खाली नमूद केल्याप्रमाणे शासनाद्वारे निर्गमित केलेल्या *मार्गदर्शक सूचनाचे काटकोरपणे पालन करण्यात यावे* असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे.
१. कोविड- १९ उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे.
त्यास अनुसरून बकरी ईद नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न
करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी.
२. सध्या कार्यान्वीत असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची
असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दुरध्वनीवरून जनावरे खरेदी करावी.
३. नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी.
४. प्रतिबंधित (Containment) क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आल्नेले निबंध कायम राहतील.
५. बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये किंवा एकत्र जमू
नये.
६. कोविड- १९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण,
वेद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित
केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. असे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
बाइक से गिराकर किया वार, एक गिरफ्तार दो अन्य की तलाश #vidarbhanews...
प्रॉपर्टी विवाद में दामाद की पीट-पीटकर हत्या, ससुराल पक्ष के दो आरोपी...
वणी में सोनम वांगचुक समर्थन में सर्वदलीय प्रदर्शन #vidarbhanews #wani #news #vidarbha...
नीट पेपर लीक पर छात्रों का प्रदर्शन #vidarbhanews #nagpur #vidarbha #nagpurnews #nagpurtoday...
वडेट्टीवार ने सदाभाऊ खोत पर बोला तीखा हमला #maharashtranews #mumbai #newsupdate #maharashtra
संजय राउत ने पुलिस कार्रवाई पर सवाल उठाए #maharashtranews #delhi #vidarbhanews #nagpurnews...





