Published On : Wed, May 29th, 2019

गोंडेगाव ला घराला आग लागुन सामानाची राखरांगोळी

आगीत गाईचे दोन वासरू जळाले

कन्हान: गोंडेगाव येथील भगवान रच्छोरे यांच्या घराला भरदुपारी अचानक आग लागुन घरातील सामानाची राख रांगोळी झाली आणि गाईचे दोन वासरू जळाल्याने शेतकऱ्याचे अडीच ते तीन लाखाचे नुकसान झाले.

मंगळवार (दि.२८) ला दुपारी २ वाजता दरम्यान गोंडेगाव येथील शेतकरी भगवान दामोधर रच्छोरे यांच्या घराला अचानक आग लागली. दुुपारची वेळ असल्याने गावकरी घरात आराम करित असल्याने गाव सानसुन होते. काही लोकांना घराला आग लागल्याचे दिसल्याने आरडाओरड करून गावक-यांना एकत्र करून आग विझविण्याचे मदत कार्य करे पर्यंत आगीने रोंध्र रूप धारण करून घरातील सामानाची राख रांगोळी झाली. आणि गाईचे दोन वासरू जळाले. सरपंच नितेश राऊत यांनी वेकोलि गोंडेगाव कोळशा खुली खदान ची अग्निशमन गाडी बोलावुन आगीवर नियंत्रण मिळविल्याने आजुबाजुच्या घराना आगी पासुन वाचविण्यात आले.
या घरी १) भगवान दामोधर रच्छोरे २) निर्मला सुरज रच्छोरे ३) मोहन भगवान रच्छोरे ४) सुंदरलाल भगवान रच्छोरे ५) गेंदलाल भगवान रच्छोारे ६) अनिल रामराव बपोरे (जावई ) हे राहत असुन भगवानजी च्या बहिणीच्या मुलाचे (दि २९) ला लग्न असल्याने घरची सर्व मंडळी येरखेडा कामठी ला जाण्याची तयारी करित असतानाच आग लागल्या चे कळताच सर्वानी घराबाहेर निघुन गावक-यांच्या मदतीने आग विझविण्या चा पर्यंत केला. परंतु आगीत घरातील सामान, आडे फाटे जळुन राखरांगोळी व गाईचे दोन वासरू जळाल्याने या शेतकरी कुटुंबाचे अंदाजे अडीच ते तीन लाखाचे नुकसान झाल्याचे बोलल्या जात आहे.

घराला अचानक आग लागुन शेतकरी रच्छोरे परिवाराचे लाखोचे नुकसान झाल्याने शासनाने हयाना आर्थिक मदत करावी अशी मागणी गोंडेगाव चे सरपंच नितेश राऊत व उपसरपंच सुभाष डोकरीमारे सह गावक-यांनी केली आहे.

– मोतीराम रहाटे,कन्हान