Published On : Fri, Sep 13th, 2019

गोंड राजे बख्त बुलंदाशहा पुण्यतिथी निमित्त म.न.पा. तर्फे अभिवादन

नागपूर : उत्कृष्ट प्रशासक धाडसी राजा बख्तबुलंदशहा (उईके) यांच्या पुण्यतिथी निमित्त धरमपेठ झोनचे सभापती श्री. अमर बागडे, नगरसेवक श्री.प्रमोद कोवरती, नगरसेविका श्रीमती आशा उईके यांनी म.न.पा.च्या वतीने विधान भवन चौक स्थित राजे बख्त बुलंदशहा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

या प्रसंगी सर्वश्री. भिमराव मडावी, शंभु गोंड, रामभाऊ धुर्वे, दिनेश सयाम, विशमाला टेकाम, अनिल कोथे, गोंडवाना गणतंत्र पक्षाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.