Published On : Thu, Jul 30th, 2020

सावनेर मध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बार्टी तर्फे सुवर्ण संधी

सावनेर– डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मार्फत सर्व घटकांतील विद्यार्थ्यांसाठी एमपी एससी,युपीएससी, आयबीपी एस, बॅकीग साठी ऑनलाईन क्लासेस संपूर्ण महाराष्ट्रात सुरू करण्यात येणार आहे.

तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी बार्टीच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून क्लासेसचा लाभ घ्यावा. या क्लासेस साठी विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची फीस भरावी लागणार नाही. क्लासेस निःशुल्क असल्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याकरिता आवेदन सादर करावे, असे आवाहन सावनेर तालुक्यातील बार्टीचे समतादूत वंदना सतीश गोडबोले(वानखेडे) यांनी केले आहे.

कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी संपर्क होतं नसल्यामुळे सोशल माध्यमाचा वापर करून माहिती दिली जात आहे. सदर उपक्रम बार्टीचे महासंचालक मा. कैलास कणसे, मुख्य प्रकल्प संचालिका मा.प्रज्ञा वाघमारे, जिल्हा प्रकल्प अधिकारी मा. दिनेश बारई , यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे