Published On : Wed, Aug 1st, 2018

धान लावण्या करिता पेंच कालव्याचे पाणी दया

Advertisement

कन्हान : – पेंच पाटबंधारे उपविभाग टेकाडी कॉलोनी येथील कार्यालयात शाखा अभियंता यास परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यानी धान लावणी (रोहणी) करिता पेंच कालव्याचे पाणी दया .अन्यथा ४ ऑगस्ट नंतर तिव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी निवेदन देऊन दिला आहे .
निसर्गाने दंडी मारल्याने पारशिवनी, रामटेक, मौदा परिसरातील धान रोहणीचे ( लावण्याची ) कामे थांबल्याने शेतकरी चिंतातुर झाल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांनी पेंच पाटबंधारे उपविभाग टेकाडी कॉलोनी येथील कार्यालयात शाखा अभियंता श्रेणी १ मा मोरघडे साहेब हयाना निवेदन देऊन धान रोहणी (लावण्या ) करिता पेंच कालव्याचे पाणी सोडुन दया .

अशी मागणी केली असुन प्रतिलिपी मा . तहसिलदार पारशिवनी मा. वरूण सहारे हयाना देण्यात आली आहे . तसेच पेंचचे पाणी धान लावणी करिता ४ ऑगस्ट पर्यंत दिले नाही तर तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुध्दा देण्यात आला आहे . याप्रसंगी रामटेक श्रेत्राचे आमदार डी एम रेड्डी , नागपुर जिल्हा परिषद उपाध्यक्ष शरद डोणेकर, किशोर बेलसरे, दयाराम भोयर, रामनाथ यादव, सुर्यभगवान भास्कर रेड्डी कैलास खंडाळ, योगेश वाडीभस्मे, देवाजी ठाकरे , जिवन मुंगले , संजय सत्येकार, प्रशांत मसार, पवन काठोके, राहुल वानखेडे , प्रशांत ठाकरे उपस्थितीत राहुन मागणी केली .

Advertisement
Advertisement

मध्य प्रदेशातील नविन बनलेल्या चौराई धरणामुळे मागील वर्षी पेंच धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध न झाल्याने पेंच धरणाचे पाणी सोडण्यात न आल्याने तसेच निसर्गाने सुध्दा दंडी मारल्याने परिसरातील धान उत्पादक शेतकरी धान पिकांचे उत्पादन घेऊ शकले नाही . या वर्षी सुरूवातीच्या पावसाने पेंच धरणात जलसाठा व्यवस्थित होत आहे . या वर्षी ऐन रोहणीच्या वेळेवर निसर्गाने (पावसाने) दंडी मारल्याने पारशिवनी, रामटेक, मौदा परिसरातील धान रोहणीचे कामे थांबल्या आहे .

करिता पेंच कालव्याचे पाणी सोडण्यात येऊन धान उत्पादक शेतकऱ्यांना व लोकांना जगवा अशी कडकडीची मागणी लक्ष्मण खंडाळ, रामभाऊ ठाकरे , रामभाऊ धोटे , राजेंद्र महाले , पुरुषोत्तम ठाकरे , पुरुषोत्तम हिवसे , गज्जु लेकुरवाळे, प्रकाश भोयर, मुकेश यादव, सचिन खंडाळ, शुभम झाडे , अजय इंगोले , ईश्वर हारोडे, गुलाब सोनवाने , गणेश कोकाटे, यशवंतराव नेऊल, अजित मंगर, चंद्रभान वानखेडे , धर्मराज खडसे , दिलीप बंड, दिंगाबंर खेरगडे, भिमराव काकडे , देवचंद देमदे , सुनील दारोडे , देवराव बालकोटे, महावीर पु-हे, चिरकुट बांगरे , पिंटु नितनवरे , अनिल राऊत, खालीद अहमद, घनश्याम निबोंणे , सुरेश हेटे, दिनेश सातपुते , रोशन ढोमणे , अर्जुन ऊके , पांडुरंग शेळके , रविंद्र बागडे , किशोर ठाकरे , धर्मेद्र रच्छोरे , प्रभाकर बोराडे सह परिसरातील मोठय़ा संख्येने धान उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थितीत होऊन धान लावणी करिता पाणी सोडण्याची मागणी केली आहे .

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement