Published On : Sun, Jul 14th, 2019

प्रथम वर्षाच्याअ प्रवेशात वाढीव जागा द्या:-दादा कांबळे

कामठी :-नागपूर विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया आटोपत असल्या तरी बरेच विद्यार्थी वेटिंग लिस्ट मध्ये असल्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये तसेच 11 वि विज्ञान शाखेची तुकडी येथील एस के पोरवाल महाविद्यालयात वाढविण्यात यावी अशी मागणो भारिप बहुजन महासंघाचे कामठी शहराध्यक्ष व माजी नगरसेवक दादा कांबळे यांनी केली आहे.

नागपूर जिल्ह्याचे उपनगर म्हणून कामठी शहराची ओळख आहे.या शहरातील जगप्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस टेम्पल मुळे कामठी शहराची जगाच्या नकाशावर नोंद आहे जे या शहरातील नागरिकांसाठी अभिमानास्पद आहे.दहावी पास झाल्यानंतर विद्यार्थिवर्ग आपल्या उज्वल भविष्याची कास धरत महाविद्यालयीन प्रवेशाकडे धाव घेतात . येथील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेत प्रथम वर्षात प्रवेश घेण्यासाठी एकमेव असलेल्या एस के पोरवाल महाविद्यालयाकडे विद्यार्थिवर्ग धाव घेतात .

दरम्यान या प्रवेश प्रक्रिया स्पर्धेत एका विशिष्ट गुणांक टक्केवारीवर प्रवेश प्रक्रिया करीत इतर वेटिंग लिस्ट वर ठेवले जातात आणि वाढीव जागा आल्यावरच या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो वा व्यवस्थापन कमिटी च्या शिफारस ने प्रवेश दिला जातो मात्र या परिस्थितीत कित्येक होतकरू विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची पाळी आली की शिक्षण घेण्याची पद्धत बदलवतात व परिस्थितिशो समझोता करोत सायन्स मध्ये प्रवेश न घेता आर्ट वा कॉमर्स मध्ये नाही तर अभियांत्रिकी प्रवेशाकडे लक्ष पुरवितात .

तेव्हा विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याचा विचार करीत विद्यापीठ नोयमांतर्गत होतकरू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून एस के पोरवाल महाविद्यालयाने कायद्यान्वये अतिरिक्त जागा वाढवून विद्यार्थ्यांना शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून द्यावी तसेच विज्ञान शाखेची तुकडी वाढवून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा अशी मागणो माजी नगरसेवक दादा कांबळे यांनी केले आहे

संदीप कांबळे कामठी