Published On : Thu, Oct 12th, 2023
By Nagpur Today Nagpur News

संपूर्ण दीक्षाभूमी परिसरात स्वच्छतेला प्राधान्य द्या मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली परिसराची पाहणी

Advertisement

नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिन मुख्य समारंभ आणि इतर दिवशी देखील दीक्षाभूमीवर येणा-या बौद्ध अनुयायांची सुविधा आणि आरोग्याच्या दृष्टीने संपूर्ण दीक्षाभूमी परिसरामध्ये स्वच्छतेला प्राधान्य द्या, असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे करण्यात येत असलेल्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आयुक्तांनी बुधवारी (ता.११) दीक्षाभूमी येथे भेट दिली. यावेळी मनपाचे अधिकारी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे पदाधिकारी यांच्यासमवेत आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, मुख्य अभियंता श्री. राजीव गायकवाड, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त श्री. मिलींद मेश्राम, कार्यकारी अभियंता श्री. अजय मानकर, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. बी.पी. चंदनखेडे, कार्यकारी अभियंता सर्वश्री रवींद्र बुंधाडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे डॉ. सुधीर फुलझेले, श्री. विलास गजघाटे, डॉ. प्रदीप आगलावे, लक्ष्मीनगर झोनचे सहायक अधीक्षक श्री. धनंजय जाधव, झोनल अधिकारी श्री. रामभाउ तिडके, उपअभियंता श्री. राजेंद्र राठोड, केंद्र अधिकारी श्री. तुषार बाराहाते आदी उपस्थित होते.

Advertisement

२४ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लाखो बौद्ध अनुयायी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दीक्षाभूमीवर येणार आहेत. २२ ते २५ ऑक्टोबर या कालावधीमध्ये नागपूर महानगरपालिकेद्वारे दीक्षाभूमीवर अनुयायांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. लाखोंच्या संख्येत येणा-या बौद्ध अनुयायांना आरोग्यपूर्ण सुविधा मिळाव्यात यासाठी संपूर्ण दीक्षाभूमी परिसरामध्ये स्वच्छतेला विशेष प्राधान्य देण्याबाबत आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रशासनाला निर्देश दिले.

यावेळी त्यांनी दीक्षाभूमीचा संपूर्ण परिसर, मुख्य समारंभाचे ठिकाण, डॉ. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट studies अँड रिसर्च येथील इमारतीच्या मागील बाजूस असलेली तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था, माता कचेरी परिसर आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय) येथील शौचालयाची व्यवस्था या सर्व व्यवस्थेची पाहणी केली. दीक्षाभूमी स्तूप, तसेच सर्व मार्ग आणि शौचालयांच्या ठिकाणी वीज पुरवठा निरंतर सुरू राहील याकडे कटाक्षाने लक्ष देणे तसेच प्रसाधनगृहांमध्ये वीज पुरवठ्यासोबतच निरंतर पाणी पुरवठा देखील ठेवणे आणि सर्व शौचालयांच्या ठिकाणी स्वच्छतेसाठी हँडवॉशची व्यवस्था करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.