Published On : Wed, Jan 17th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपूरजवळ धावत्या ट्रेनच्या वॉश रूममध्ये चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न: कोच अटेंडेंटला प्रवाशांनी चोपले

Advertisement

नागपूर : पाटलीपूत्र एक्सप्रेसमध्ये मंगळवारी रात्री धक्कादायक घटना घडली आहे. कोच अटेंडन्सने ट्रेनच्या स्वच्छता गृहात चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना समोर आली.

माहितीनुसार, मोहम्मद मुन्ना (वय ५०) असे आरोपीचे नाव आहे. तो गया (बिहार) मधील रहिवासी आहे. गेल्या आठ वर्षांपासून तो रेल्वेत कोच अटेंडन्स म्हणून काम करतो. बेंगलुरू पटना पाटलीपूत्र एक्सप्रेसच्या एसी थ्री टायरमधील बी- २ कोचमध्ये त्याची ड्युटी होती. या कोचमध्ये एक ७५ वर्षीय वृद्धा, तिची विवाहित मुलगी अन् नात (वय ९) तसेच छोटा नातू यांच्यासह प्रवास करीत होती. ही गाडी नागपूरकडे येत असताना बुटीबोरी स्थानकाजवळ ९ वर्षीय मुलगी बाथरूमला जाण्यासाठी निघाली. यावेळी मध्यरात्री १ ते १.३० ची वेळ झाली होती. कोचमधील बहुतांश प्रवासी झोपले होते.

Gold Rate
Sept 11,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 52,600 /-
Gold 22 KT ₹ 1,41,600 /-
Silver/Kg ₹ 2,28,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुलगी बाथरूममध्ये जाताच आरोपी मुन्ना दार ढकलून बाथरूममध्ये गेला. दाराची कडी आतून लावून घेतल्यानंतर त्याने मुलीसोबात अश्लील चाळे कारण्यास सुरुवात केली. घाबरलेल्या मुलीने आरडाओरडा सुरु केला. यानंतर आरोपीने घाबरून बाथरूमच्या दाराची कडी उघडली. मुलगी बाहेर आल्यानंतर पळत आपल्या आईकडे गेली आणि घडलेला प्रकार सांगितले. अवघ्या ९ वर्षीय बालिकेवर धावत्या ट्रेनमध्ये बलात्काराचा प्रयत्न झाल्याचे कळाल्याने आरोपीला ट्रेनमधील प्रवाशांनी बेदम मारहाण केली. या घटनेची रेल्वे प्रशासनाला माहिती देण्यात आली.

दरम्यान ठाणेदार मनीषा काशिद यांनी पीडित मुलीला विचारपूस केल्यानंतर तिच्या आईची फिर्याद नोंदवून घेतली. त्यावरून पोक्सो (मुलांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण कायदा)नुसार गुन्हा दाखल केला. रात्री या प्रकरणात आरोपी मुन्नाला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू केला आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.