Published On : Fri, Aug 6th, 2021

पांढराबोडी येथील घरकुल यादीत घोळ

पात्र लाभार्थ्यांना डावलले,नागरिकांमध्ये रोष

भंडारा: जवळच असलेल्या पांढराबोडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेकरिता पात्र असलेल्या लाभार्थ्यांना डावलुन अपात्र असलेल्यांना घरकुलाकरिता पात्र ठरविण्यात आले आहे. यामुळे खर्‍या लाभार्थ्यांना घरकुलापासुन वंचीत राहावे लागणार असल्याने लाभार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाला असुन घरकुलाच्या यादीत सरपंच, सचिव व संगणक चालक यांनी घोळ केला असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.

सन २०१८-१९ मध्ये शासन नियमाप्रमाणे घरकुल मिळण्याकरिता प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत ग्रामपंचायत पांढराबोडीकडे अर्ज करण्यात आले होते. त्यानुसार घरकुलासाठी पात्र लाभार्थी निवडण्याकरिता सर्व्हे करण्यात आले. या सर्व्हेत घरकुलासाठी पात्र असलेल्यांची यादी तयार करण्यात आली. परंतु सन २०२०-२१ मध्ये पात्र लाभार्थ्यांची यादी प्रकाशीत करण्यात आली. या यादीत जे लाभार्थी घरकुलासाठी खरोखरच पात्र आहेत, अशांना डावलुन पक्के घर असलेले, एकाच घरातील २-३ लोकांचा समावेश पात्र लाभार्थ्यांमध्ये करण्यात आला. यामुळे खर्‍या लाभार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

घरकुलाच्या यादीत झालेला घोळ हा सरपंच, सचिव व संगणक चालकांनी केला असल्याचा आरोप अपात्र ठरलेल्या परंतु, वास्तवात पात्र असलेल्यांनी केला आहे. घरकुलाच्या यादीत झालेल्या घोळाची चौकशी करुन खर्‍या लाभाार्थ्यांचा समावेश पात्र लाभार्थ्यांच्या यादीत करण्यात यावा, अशी मागणी खंडविकास अधिकारी पंचायत समिती भंडारा, मुख्य कार्यपालन अधिकारी जि.प. जिल्हाधिकारी, खासदार व आमदार यांना निवेदनातुन करण्यात आली आहे.

नव्याने सर्व्हे करुन पात्र लाभार्थ्यांचा समावेश करण्यात येईल-सरपंच
प्रधानमंत्री आवास योजनतेकरिता आम्ही सर्व्हे करुन १७७ लाभार्थ्यांची यादी तयार करुन ऑनलाईन केली होती. त्यातुन १११ लाभार्थी हे पात्र ठरले तर ६६ लाभार्थी हे अपात्र ठरले. यात ग्रामपंचायत स्तरावर कुठलाही घोळ करण्यात आला नाही. हा सर्व घोळ ऑनलाईन सॉफ्टवेअरमुळे झाला आहे. या संदर्भात बिडीओ पंचायत समिती भंडारा यांच्याशी बोललो आहे. त्यांनीही या विषयाला सकारात्मक प्रतिसाद देऊन नव्याने सर्व्हे करुन पात्र लाभार्थ्यांचा समावेश करण्यात येईल, असे सांगीतल्याचे सरपंचा नलिनी भुरे यांनी सांगीतले.

सरपंच व सचिवाने सांगीतले तसे मी केले-संगणक चालक
ग्रामपंचायतने दिलेली यादी मी ऑनलाईन केली. सरपंच व सचिव यांनी सांगीतल्याप्रमाणे डाटा एन्ट्री केली असल्याचे ग्रामपंचायतचे संगणक चालक लिलाधर वाघमारे यांनी सांगीतले.

पात्र लाभार्थ्यांना डावलले,नागरिकांमध्ये रोष
भंडारा: जवळच असलेल्या पांढराबोडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेकरिता पात्र असलेल्या लाभार्थ्यांना डावलुन अपात्र असलेल्यांना घरकुलाकरिता पात्र ठरविण्यात आले आहे. यामुळे खर्‍या लाभार्थ्यांना घरकुलापासुन वंचीत राहावे लागणार असल्याने लाभार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाला असुन घरकुलाच्या यादीत सरपंच, सचिव व संगणक चालक यांनी घोळ केला असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.

सन २०१८-१९ मध्ये शासन नियमाप्रमाणे घरकुल मिळण्याकरिता प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत ग्रामपंचायत पांढराबोडीकडे अर्ज करण्यात आले होते. त्यानुसार घरकुलासाठी पात्र लाभार्थी निवडण्याकरिता सर्व्हे करण्यात आले. या सर्व्हेत घरकुलासाठी पात्र असलेल्यांची यादी तयार करण्यात आली. परंतु सन २०२०-२१ मध्ये पात्र लाभार्थ्यांची यादी प्रकाशीत करण्यात आली. या यादीत जे लाभार्थी घरकुलासाठी खरोखरच पात्र आहेत, अशांना डावलुन पक्के घर असलेले, एकाच घरातील २-३ लोकांचा समावेश पात्र लाभार्थ्यांमध्ये करण्यात आला. यामुळे खर्‍या लाभार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. घरकुलाच्या यादीत झालेला घोळ हा सरपंच, सचिव व संगणक चालकांनी केला असल्याचा आरोप अपात्र ठरलेल्या परंतु, वास्तवात पात्र असलेल्यांनी केला आहे. घरकुलाच्या यादीत झालेल्या घोळाची चौकशी करुन खर्‍या लाभाार्थ्यांचा समावेश पात्र लाभार्थ्यांच्या यादीत करण्यात यावा, अशी मागणी खंडविकास अधिकारी पंचायत समिती भंडारा, मुख्य कार्यपालन अधिकारी जि.प. जिल्हाधिकारी, खासदार व आमदार यांना निवेदनातुन करण्यात आली आहे.