Published On : Tue, Jul 25th, 2017

घाटकोपरमध्ये चार मजली इमारत कोसळली, ढिगा-याखाली 30 लोक अडकल्याची भीती

Advertisement

मुंबई: घाटकोपरच्या दामोदर पार्क येथील चार मजली इमारत कोसळली असून बचावकार्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या इमारतीखाली काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दलाचे जवान युद्धपातळीवर बचावकार्य करत आहेत.

एनडीआरएफचे पथकही घटनास्थळी रवाना झाले आहे. 30 पेक्षा जास्त लोक ढिगा-याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

घाटकोपरमधील साई अपार्टमेंटमधील ही इमारत कोसळली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सतत जोरदार पाऊस सुरू असून या पावसामुळेच ही इमारत ढासळ्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, 9 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात जवानांना यश मिळाले आहे. तर 30 पेक्षा जास्त लोक ढिगा-याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

घाटकोपरमधील एलबीएस रोडवर श्रेयस सिनेमाजवळ ही इमारत होती. तसंच मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने घटनास्थळी तात्काळ मदत यंत्रणा पाठवली आहे. बचावकार्य सुरु आहे. ही इमारत सकाळी 10. 45 वाजण्याच्या सुमारास कोसळली. इमारतीच्या तळ मजल्यावर असणाऱ्या नर्सिंग होमचे नुतनीकरण सुरू होते. त्यामुळे या नर्सिंग होममध्ये तीन ते चार रुग्ण आणि कर्मचारी असल्याची माहिती समजतेय. या इमारतीमध्ये 15 कुटुंब वास्तव्यास होते. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 25 जण अडकले असल्याची शक्यता प्रभाग समिती अध्यक्ष सुरेश पाटील यांनी व्यक्त केली.

या इमारतीला रिकामी करण्यासाठी पालिकेकडून नोटीस मिळाली होती का ? त्याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही. दरवर्षी पालिकेकडून पावसाळयात धोकादायक इमारतींना नोटीस बजावली जाते. मात्र अनेक सोसायट्या याकडे दुर्लक्ष करतात आणि अशा धक्कादायक घटना घडतात.

Advertisement
Advertisement