Published On : Mon, Jan 8th, 2018

सतत मलाईदार खात्यात राहून खात आहे अधिकारी मलाई ते आहेत का म.न.पा चे जावई? युवक काँग्रेसचा प्रहार: घंटानाद आंदोलन

Advertisement


नागपूर: नागपूर महानगर पालिका मुख्य कार्यालय सिविल लाईन येथे नागपूर लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष व नगरसेवक बंटी बाबा शेळके यांच्या मार्गदर्शनात व तुषार मदने, निखिल कापसे, आसिफ अंसारी यांच्या नेतृत्वात म. न. पा वर प्रहार करून घंटानाद आंदोलन केले नगरसेवक बंटी शेळके म्हणाले की नागपूर महानगर पालिकेत कित्येक अधिकारी कोणाच्या मर्जिने मलाईदार खात्यात ठान मांडून बसले आहे यांनी भ्रस्टाचाराची सिमा ओलांडली आहे एका एका अधिकाऱ्यांकड़े दोन दोन तीन तीन विभागाचा अतिरिक्त कार्यभार आहे आमचे म्हणणे असे आहे की सर्वच अधिकारी भ्रस्ट नाही पण काही निवडक अधिकाऱ्यांमुळे जनतेचे नुकसान होणे पण प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या तसेच समजले जाते नागपूर महानगर पालिकेच्या या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे जनता त्रस्त झाली आहे ही कॉर्पोरेशन नसून कर परेशान झाली आहे कुणाचे कुणावर नियंत्रण नाही आपल्या मर्जिने मस्तावल्या पणे वागतात याचे कारण त्यांना मिळणारे सत्ता पक्षाचे अभय आयुक्त अजूनही नवे आहे त्यांना नागपूर महानगर पालिका समजली नाही

नागपूर महानगर पालिकेतिल ज्या अधिकाऱ्यांना सत्तापक्षाचे अभय आहे ते मिलिंद मेश्राम सहाय्यक आयुक्त कर आकारणी, L. B. T व बाज़ार विभाग, महेश धामेचा सहाय्यक आयुक्त सामान्य प्रशासन व निवडणूक विभाग, अशोक पाटिल सहाय्यक आयुक्त गाँधीबाग झोन व अतिक्रमण विभाग, पारस शर्मा ग्रंथालय अधीक्षक व स्वीय सहाय्यक अपर आयुक्त, डी. डी जाम्भूलकर कार्यकारी अभियंता स्लम व वाहतूक, मती जय थोटे हत्तीरोग, हिवताप व रोग नियंत्रण, राजेश भूते सहाय्यक आयुक्त स्थावर हे अधिकारी अतिशय मगरूर पणे वागतात आयुकतांनी याकड़े लक्ष द्यावे व अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर करवाई करून स्वच्छ चारित्राचे प्रामाणिक अधिकारीयांना बसवावे अशी मागणी नगरसेवक बंटी शेळके यांनी केली तसेच दूसरी कड़े सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने नवीन पायंडा घातला आहे की जे अधिकारी सेवानिवृत्त झाले त्यांना पुन्हा सेवेत नियुक्त करतात त्यांना पेंशन व् पगार असा दुहेरी लाभ मिळून राहिला आहे.


प्रधानमंत्र्यांनी घोषणा केली होती की दोन करोड़ युवकांना रोजगार निर्माण करू पण त्यांचे आश्वाशन हवेतच राहिले मात्र सुशिक्षित बेरोजगारांना रोजगारा पासून वंचित ठेवत आहे तसेच खाजगी करण्याचा गोरख धंधा आणून कंत्राट पद्धत्ती वर नागपूर महानगर पालिका काम करीत आहे. कनक, OCW, आपली बस, सायबर टेक आणि इतर कंपन्यांना महापालिका चालव्याला देऊन महापालिकाच खाजगी करा असा टोमना नगरसेवक बंटी शेळके यांनी मारला।आजच्या या आंदोलनात नगरसेविका जीशान मुमताज़, शालिनी सरोदे, इरफान काज़ी, रिज़वान रुवमी, जयसिंघ चव्हाण, आसिफ अंसारी, तुषार मदने, निखिल कापसे, राजेंद्र ठाकरे, स्वप्निल बावनकर, फैज़लुर कुरैशी, तेजस जिचकार, आयुष हिरनवार, नागेश जुनघरे, नितिन धांडे, गुड्डू भाई, फरदीन खान, विक्टोरिया फ्रांसिस, सुनील ठाकुर, स्नेहलता शुक्लावार, दिवाकर पलांदुरकर, अद्दू अढूलकर, सौरभ शेळके, हेमंत कातुरे, पूजक मदने, आशीष लोनारकर, नितिन गुरव, निखिल वानखेड़े, विजय मिश्रा, अभिलाष बावने, सौरभ निंबालकर, रवी काळमेघे, बादल शर्मा, ऋषभ तिवसकर, विलास डांगे, नामदेव दुपारे, केशव वैद्य, नितिन खुभाङ्कर, प्रफुल इंजनकर इत्यादि आंदोलनात उपस्तिथ होते।