Published On : Mon, Mar 23rd, 2020

रामटेक येथिल काही भागात घानीचे साम्राज्य

नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता

रामटेक-कोरोना चे सावट आज संपूर्ण जग भर पसरले आहे आज परिस्थिती खूप गंभीर आहे. आणि एकीकडे रामटेक येथील स्वामी विवेकानंद वार्ड तसेच रामालेश्र्वर वॉर्ड व इतरही ठिकाणी घानीचे साम्राज्य पसरलेले असुन आरोग्यास निमंत्रन देत आहे.

डबक्यातील पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात स्वामी विवेकानंद वार्डातील ठाकूर नगर येथील नवीन बांधकाम झालेल्या घराजवळील रिकाम्या भागात आजूबाजूच्या घरातील दररोजचे घाण पाणी जमा होत असून आजपर्यंत रिकाम्या जागेवर दररोजचे पाणी जमा होत असून मोठ्या प्रमाणावर दलदल निर्माण झाली आहे. या पाण्याचा खूप जास्त प्रमाणात घाण वास पसरत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.


ह्या रोडवर कचरा गाडी पण नाही येत , रामालेश्र्वर वॉर्डमधे देखील काही ठिकाणी घाण दिसून येते. माजी सभापती लक्ष्मण उमाले यांचे मते मुद्दा हा आहे की या भागात घाण पाणी नवीन वस्तीबाहेर जाण्यासाठी नाली निर्माण न केल्यामुळे सर्व घरांचे पाणी एकाच ठिकाणी जमा होत आहे. त्यामुळे त्या घाण पाण्यामुळे मोठ्या संख्येने डास निर्माण होऊन वस्तीतील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे आणि यासंबंधीचे निवेदन त्यांनी वारंवार नगरपालिका ,नगरसेवक व लोकप्रतिनिधींना दिलेले असून कोणीच त्यावर उपाययोजना करीत नाही असे चित्र दिसत आहे.

वारंवार घाण पाण्यावरून शेजारील घरातील लोकांची आपापसांत भांडणे देखील होत आहेत. पण परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी ताबडतोब उपाययोजना नगरपालिकेनी करावी अशी मागणी बाजार समिती चे माजी सभापती लक्ष्मण उमाळे,मारोती ठाकरे,लीलाधर सोनवणे,देवराव बरबटे, भीमराव घरझाडे व परिसरातील त्रस्त नागरिकांनी केली आहे.