Published On : Tue, Feb 11th, 2020

गरंडा येथे दहावी,बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव

कन्हान : – दहावी, बारावीत मेरीट आले ल्या विद्यार्थ्यांचा गौरव सर्वच करतात. परंतु जे विद्यार्थी साधारण गुण घेऊन यशस्वी होतात त्यांच्याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. मात्र पारशिवनी तालुक्यातील गरंडा या छोट्या गावात गावकरी आणि आस फाऊंडेशन गरंडा यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रामायण – ज्ञानोदय या कार्यक्रमात २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावी परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या अर्चना भोयर तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य संदीप भलावी, मंगला निंबोणे, सरपंच चक्रधर महाजन, सामाजिक कार्यकर्ते दीपक भोयर, बंटीभाऊ निंबोणे, ग्रा.पं. सदस्य राष्ट्रपाल मेश्राम, मुख्याध्यापिका नलिनी ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते. गावात होणाऱ्या ग्रामायाण – ज्ञानोदय या नावीन्यपूर्ण कार्यक्रमात दहावीत यशस्वी झालेल्या आरती धनराज आपूरकर,सृष्टी काशिनाथ क्षीरसागर यांचा तर बारावीत यशस्वी झालेल्या सोनाली साहेबराव धोटे, कल्याणी रवींद्र धोटे, गौरव धनराज आपूरकर, प्रज्वल राजेंद्र टाले, विजय रतिराम मेश्राम या विद्यार्थ्यांना मान्यवरां च्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्या त आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राम पंचायत कर्मचारी आनंद चव्हाण यांनी, प्रास्ताविक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राष्ट्रपाल बोंबले तर आभार प्रदर्शन पोलीस पाटील संदीप मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक खुशाल कापसे, अंगणवाडी सेविका संघमित्रा शेंडे, प्रवीण गजभिये, प्रशांत गजभिये, अजय गजभिये यांनी परिश्रम घेतले.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement