Published On : Mon, Aug 27th, 2018

नागपूरच्या गंगाजमुनातील वेश्या वस्तीत छापा

Advertisement

नागपूर : लकडगंज पोलिसांनी गंगाजमुनातील वेश्या वस्तीत छापा मारून शनिवारी सायंकाळी १६ महिला आणि ७ पुरुषांना अटक केली. या कारवाईमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.

गेल्या अनेक वर्षांपासून नागपुरात गंगाजमुना परिसरात वेश्याव्यवसाय केला जातो. मध्यंतरी पोलिसांनी धडक कारवाई करून ही वेश्यावस्ती उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न केले. येथील ८० टक्के वेश्या आणि दलाल पळून गेले असले तरी २० टक्के वेश्या आणि त्यांच्याकडून हा धंदा करवून घेणारे दलाल कार्यरत आहेत.

Gold Rate
07 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,20,500 /-
Gold 22 KT ₹ 1,12,100 /-
Silver/Kg ₹ 1,49,200/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुख्य रस्त्याच्या कडेला उभे राहून येणाऱ्याजाणाºयांना त्या अश्लिल अंगविक्षेप आणि इशारे करून आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात.

आजही असाच प्रकार सुरू असल्याची माहिती कळाल्याने पोलीस उपायुुक्त राहुल माकणीकर, एसीपी वालचंद्र मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.व्ही. खांडेकर यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक राखी गेडाम, उपनिरीक्षक पी. जी. गाडेकर, एएसआय रवी राठोड, हवलदार प्रकाश सिडाम, नितीन तिवारी, गोपाल थोटे, नायक सुनील ठवकर, रंजित सेलकर, राम यादव, फिरोज शेख, शिवराज पाटील, भूषण झाडे आणि रूपाली शिंगडे यांनी शनिवारी सायंकाळी तेथे छापा मारून १६ वारांगना तसेच ७ ग्राहकांना रंगेहात पकडले.

त्यांच्याविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ प्रमाणे कारवाई करण्यात आली.

Advertisement
Advertisement