नागपूर – शहरातील कुप्रसिद्ध गंगा–जमुना परिसरात लकडगंज पोलिसांनी मध्यरात्री केलेल्या धडक कारवाईत नाबालिग मुलीला देहव्यापाराच्या जाळ्यात अडकविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी पीडितेची सुटका करत दोन महिलांसह चार जणांविरोधात गुन्हा नोंदवला असून एकाला घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले आहे. सर्व आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले गेले, तर नाबालिगेला सुधारगृहात हलविण्यात आले.
प्रकार कसा समोर आला?
पोलिसांना माहिती मिळाली होती की परिसरातील काही दलाल नाबालिग मुलींना देहव्यापारासाठी भाग पाडत आहेत. त्यानुसार लकडगंज पोलिसांनी गुरुवार–शुक्रवारच्या मध्यरात्री छापा टाकला. यावेळी १७ वर्षीय पीडिता आढळून आली. तीला राजस्थानातून आणून देहव्यापारात ढकलले जात असल्याचे स्पष्ट झाले.
या आरोपींवर गुन्हा-
साजना बंटी हेमनानी (५२), भांडेवाडी
बसंती कालखोर (५०), मूळ ग्वालियर, सध्या गंगा–जमुना
बलवीर उर्फ मंसाराम कालखोर (२५), गंगा–जमुना
तरुण हृदयराम गुप्ता (२१), आदिलाबाद, तेलंगाणा
या चौघांवर नाबालिगेला जबरदस्तीने देहव्यापारात ढकलल्याचे आरोप आहेत. साजना आणि बसंती यांनी नाबालिग मुलींना फुस लावून विक्रीस लावण्याचे काम केल्याचे पोलिस तपासात दिसून आले आहे.
पोलिसांची जलद कारवाई-
कारवाईदरम्यान नाबालिगेची सुटका करून तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर तिला सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून अशा प्रकारे पीडित आणखी मुलींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews
मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...
12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews
अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY





