Published On : Sun, Apr 25th, 2021

गडकरी यांचे विदर्भातील रुग्णालयांना आवाहन

नागपूर– विदर्भातील ज्या नगर परिषदा व तालुका स्तरावरील सरकारी, गैरसरकरी व ट्रस्टतर्फे संचालित रुग्णालयांना ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन कॉन्सनस्ट्रेटर, व्हेंटिलेटरची अत्यंत तातडीची आवश्यकता आहे, त्या रुग्णालयांनी ना नितीन गडकरी यांच्या नागपूर कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन ना. गडकरी यांनी केले आहे.

कोरोनाचा वाढता उद्रेक लक्षात घेता आणि विदर्भातील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना आवश्यक असलेले ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन कॉन्सनस्ट्रेटर, व्हेंटिलेटर उपलब्ध व्हावेत यासाठी हे आवाहन करण्यात आले आहे.

Gold Rate
May 22- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 160,100 /-
Gold 22 KT ₹ 1,48,900 /-
Silver/Kg ₹ 2,71,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केलेल्या विनंतीनुसार ‘स्पाईस हेल्थ’च्या वतीने आरटी-पीसीआर टेस्ट करण्यासाठीची मोबाईल टेस्ट लॅब नागपूरमध्ये दाखल झाली आहे. या लॅबद्वारे ४२५ रूपयांत प्रतिदिन २५०० लोकांची टेस्ट केली जाणार आहे. तीन ते चार दिवसांत इन्स्टॉलेशननंतर ही लॅब सुरू होईल.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement