Published On : Mon, Oct 3rd, 2022

दीक्षाभूमीवर गडकरी-फडणवीस चा निषेध

Advertisement

काल दीक्षाभूमी स्मारक समितीने धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळ्याला नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस मुख्य अतिथी म्हणून राहणार असल्याचे घोषित केल्याने त्याचे विपरीत पडसाद आज नागपूर शहरातील बौद्ध व आंबेडकरी लोकात सर्वत्र पसरले.

मागील 40 वर्षापासून नियमितपणे दीक्षाभूमीवर दर रविवारी वंदना घेणारे नागपुरातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी वंदना संघाच्या माध्यमातून आज झालेल्या बोधीवृक्षा खालील बैठकीत नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांना दीक्षाभूमीच्या मुख्य सोहळ्याला बोलविल्याने त्याचा सामूहिक निषेध करण्यात आला.

कारण हा सोहळा संपूर्णत: धार्मिक असल्याने राजकीय क्षेत्रातील तेही बौद्ध-आंबेडकर विचारधारेच्या संपूर्ण विरोधातील विचारधारा असलेल्या प्रतिक्रांती वादी आर एस एस चे व भाजपचे प्रतिनिधित्व करीत असल्याने गडकरी व फडणवीस यांचा निषेध करण्यात आला.

दुसरे असे की स्मारक समितीने भाजप चे राज्यात व केंद्रातही सरकार असतांना दीक्षाभूमी स्तूपाच्या उत्तरेकडील कृषीची (कापूस अनुसंधान) जागा गेट उघडण्याच्या दृष्टीने मागितली असता, किव्हा पूर्वेकडील आरोग्य विभागाची जागा वेळोवेळी मागूनही दिलेली नाही. उलट स्मारकाचे काम रखडण्यासाठी खोडा घालण्याचे काम केले असाही आरोप ठेवण्यात आला.

ही नागपुरातील कदाचित पहिली प्रतिक्रिया असेल, आणखी दोन दिवसात शहरात, राज्यात व देशात अशा प्रतिक्रिया उमटू शकतात. यापूर्वी दीक्षाभूमीवर अटल बिहारी आले असता त्यांचा निषेध करण्यात आला होता, त्यात अनेकांना अटकही करण्यात आली होती.

करिता दीक्षाभूमी स्मारक समितीने त्या दोघांनाही या सोहळ्यापासून दूर ठेवावे, किव्हा त्यांनी स्वतःस दूर रहावे असे मनोगत याप्रसंगी, प्रा देवीदास घोडेस्वार, भैयाजी खैरकर, उत्तम शेवडे, भीमराव गाणार, वामन सोमकुवर यांचे सहित अनेकांनी व्यक्त केले.

उत्तम शेवडे (9421800219)
अभ्यासक बुद्ध-आंबेडकर विचारधारा