Published On : Wed, Sep 25th, 2024
By Nagpur Today Nagpur News

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची जबाबदारी गडकरी, फडणवीस, बावनकुळेंच्या खांद्यावर

Advertisement

नागपूर : केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत सुरेश भट सभागृहात विदर्भातील भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची संवाद बैठक पार पडली. त्यात विदर्भातील सर्व ६२ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला.

यावेळी वाटप करण्यात आलेल्या पत्रात विधानसभेच्या निवडणुकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि केंद्रीय मंत्री अमित शहा, नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात सामोरे जायचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे विदर्भातून विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची धुरा गडकरी, फडणवीस, बावनकुळेंच्या खांद्यावर सोपविण्यात आल्याची चित्र दिसत आहे.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान या बैठकीत कार्यकर्त्यांना पक्षातर्फे ‘संकल्प दृढ विजय का’ हे पत्रक वाटण्यात आले. त्यात महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी एक परीक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण शक्तीने या निवडणुकीला सामोरे जायचे आहे, असे नमूद करण्यात आले आहे.

निवडणूक जिंकत नाही तोवर कार्यकर्ते थकणार नाही. थांबणार नाही, विश्रांती घेणार नाही असा संकल्प करावा. काही लोक आपल्याला चक्रव्यूहात अडकवू पाहत आहेत. मात्र आपल्याला तो चक्रव्यूह भेदायचा आहे, असा कानमंत्रही कार्यकर्त्यांना या पत्रकाद्वारे देण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.