Published On : Wed, Mar 2nd, 2022
By Nagpur Today Nagpur News

गड्डीगोदाम मेट्रो स्थानकाचे काम प्रगती पथावर

Advertisement

– ९० टक्क्यांहून अधिक स्टेशनचे काम संपले

नागपूर : शहरातील सर्वात प्रमुख ठिकाणांपैकी एक असलेल्या गड्डीगोदाम मेट्रो स्टेशनचे काम वेगाने सुरू असून 90 टक्क्यांहून अधिक स्थानकाचे काम पूर्ण झाले आहे. उल्लेखनीय आहे कि, गेल्या महिन्यात डबल लाइन रेल्वे ट्रॅकवर ८०० टन वजनदार हेवी पार्ट गर्डरचे प्रक्षेपण करण्यात आले होते. हे स्थानक महा मेट्रो नागपूरच्या रीच -२ च्या मार्गिकेवर आहे जे सीताबर्डी इंटरचेंज ते ऑटोमोटिव्ह स्क्वेअर स्टेशनपर्यंत पसरलेले आहे. या स्थानकात तळमजला ते तिसऱ्या मजल्यापर्यंत चार मजले आणि इमारतीच्या चौथ्या मजल्यावर स्टेशन इमारतीचा समावेश आहे. या स्थानकाला चारही बाजूंनी व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा, दुकाने आणि गुरुद्वाराने वेढलेले आहे. स्टेशन अतिशय पर्यावरणपूरक आणि प्रवासीस्नेही आहे.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ड्रेनेजसाठी रस्त्याच्या पातळीवर रीड बेडसह १० किलोलिटर क्षमतेचे बायो डायजेस्टर बसविण्यात आले आहे. त्यानंतर स्टेशनच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यात येणार आहेत. चार मजल्यांचे एकूण मालमत्ता विकास क्षेत्र ४,५१४ चौरस मीटर (४८,६०० चौरस फूट) आहे. चौथ्या मजल्यावर (इंटरचेंज लेव्हल) एससीआर आणि टीएएम प्रदान केले गेले आहे आणि पाचव्या मजल्यावर (प्लॅटफॉर्म लेव्हल) एएसएस, एस अँड टी, ईएफओ, यूपीएस, बेबी केअर स्टेशन सुविधा यासारख्या तांत्रिक खोल्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रत्येक मजल्यावर जमिनीपासून दुसऱ्या, दुसऱ्या ते तिसऱ्या, तिसऱ्या ते चौथ्या (इंटरचेंज) आणि पुढे पाचव्या (प्लॅटफॉर्म) वर एक आणि डाऊनसाठी एक असे दोन एस्केलेटर दिले आहेत. इंटरचेंजपासून प्लॅटफॉर्मपर्यंत एक अतिरिक्त एस्केलेटर देखील दिले आहे.

स्टेशनची एकूण बांधणी 3915 चौ.मी. आहे. यात इंटरचेंज लेव्हल (११७० चौ.m.) प्लॅटफॉर्म लेव्हल (२६०० चौ.m) आणि स्ट्रीट लेव्हल – एलएचएस एंट्री अँड एक्झिट (१४५ चौरस मीटर) यांचा समावेश आहे. एकूण भूखंड क्षेत्रफळ ३११२.५९ चौरस मीटर व एकूण बिल्टअप एरिया- १३६३१ चौ.मी. यात ३८ कार आणि ४७ दुचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी दोन बेसमेंट आहेत ज्यांचे क्षेत्रफळ प्रत्येक तळघराच्या १८८५ चौरस मीटर आहे.

मालमत्ता विकास क्षेत्राच्या प्रवेशासाठी तळघर ते तिसऱ्या मजल्यावर दोन लिफ्ट. स्थानक प्रवेशासाठी तळघर ते चौथ्या मजल्यापर्यंत एक लिफ्ट आणि चौथ्या ते पाचव्या मजल्यापर्यंत एक लिफ्ट येथे देण्यात आली आहे. एलएचएसमध्ये इंटरचेंजपासून प्लॅटफॉर्मपर्यंत एक लिफ्ट आहे.

सीताबर्डी इंटरचेंज-ऑटोमोटिव्ह स्क्वेअर स्टेशन विभागात प्रवासी सेवा सुरू झाल्यानंतर आणि त्यानंतर त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील निवासी आणि व्यावसायिक भागातील प्रवाशांची योग्य सोया होईल म्हणून येथून संख्या चांगली असण्याची शक्यता आहे..

स्थानकाच्या इमारतीचा देखावा अभिनव पद्धतीचा असेल जो शहरातील सर्वात चांगल्या समजल्या जाणार्या आणि शोभा वाढवणाऱ्या स्थापत्य कलेतील इमारतींशी जुळणारा असेल.

Advertisement
Advertisement